🌟इयत्ता पहिली पासुन साखरा जिल्हा परिषद शाळेतच तिचे शिक्षण झाले🌟 ✍️शिवशंकर निरगुडे (हिंगोली) हिंगोली : - हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील साखरा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीनी कु. राजनंदिनी महेश चाकोते हीची नवोदय साठी निवड झाली आहे.इयत्ता पहिली पासुन साखरा जिल्हा परिषद शाळेतच तिचे शिक्षण झाले. पहिलीपासूनच अत्यंत हुशार आणि अभ्यासु असणारी राजनंदिनीची नवोदय साठी निवड झाल्यामुळे साखरा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकांनी तसेच साखरा आणि येथील नागरिकांनी त्या विद्यार्थीनीचे अभिनंदन केले आहे तसेच शालेय व्यवस्थापन समिती जिल्ह…
🌟जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन🌟 परभणी (दि.२६ मार्च २०२५) : परभणी जिल्ह्यातील सर्व धर्मिय समाज बांधवांनी रमजान ईद गुढी पाडवा आणि रामनवमी हे सण उत्ससाहपूर्ण वातावरणात शांततेत साजरे करावेत जिल्हा प्रशासनासह जिल्हा पोलिस प्रशासनाचे आपणास संपूर्ण सहकार्य राहिल त्यामुळे सदर सणांसह येणारे सर्व सण देखील आनंदात साजरे करावेत असे आवाहन परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्हावासियांना केले रमजान ईद, गुढी पाडवा आणि रामनवमी हे सण शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा शांतता समिती व विभागप्रमुखांची बैठक आज जिल्हा न…
🌟नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री एस.पी.सिंह बघेल यांच्या हस्ते रामकिशन रौंदळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले🌟 परभणी (दि.२६ मार्च २०२५) : पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथील गंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामकिशन दत्तराव रौंंदळे यांची अखिल भारतीय धनगर समाज महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री एस.पी.सिंह बघेल यांच्या हस्ते रौंदळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी अखिल भारतीय धनग…
🌟न्यायालयातील 900 प्रलंबित प्रकरणे निकाली निघालेली असून यात 12 कोटी 47 लाखांची रक्कम वसूली करण्यात आली🌟 परभणी (दि.25 मार्च 2025) : परभणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने दि.22 मार्च, 2025 रोजी परभणी व हिंगोली जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सर्व प्रकारची तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, भारतीय चलनक्षम दस्तऐवज अधिनियम 1889, बँक वसूली प्रकरणे, मोटार अपघातांची प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, भू-संपादन प्रकरणे, बीज प्रकरणे (चोरीची प्रकरणे वगळून) व पाणी आकार प्रकरण…
🌟एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा - कुलगुरू प्रा.डॉ इन्द्र मणि परभणी :- वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परभणी येथील कापूस संशोधन योजना आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद - केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कीटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन: गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन तंत्रज्ञान प्रसार प्रकल्प अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम २५ मार्च (मंगळवार) रोजी कापूस संशोधन योजना, परभणी येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ) इन्द्र मणि हे…
🌟एकास अटक,तीन जण निलंबित 'इरा' ने त्वरित दखल घेऊन केला तीव्र निषेध🌟 🌟महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मदन (बापू) कोल्हे यांची कडक कारवाईची मागणी🌟 परभणी : - नवी दिल्ली येथील पटेल नगर परिसरा मध्ये दि. 23 मार्च 2025 रोजी मुलाला मारत असतानाच्या घटनेचे 'हिंदुस्तान टाइम्स' च्या पत्रकार अनुश्री ह्या छायाचित्रे घेत असतांना पोलिसांनी त्यांचा कॅमेरा हिसकावून घेऊन दुसऱ्या एका पत्रकार महिलेला पोलिसांनी ढकलून तिच्या छातीला स्पर्श करून असभ्य वर्तन केले शिवाय फर्स्ट पोस्टचे पत्रकार प्रवीण सिंग यांच्या हाताला गंभीर इजा केली तसेच अनेक पत्रकारांना …
🌟रमजान ईद निमित्त घराची साफसफाई करीत असतांना कुलर चालू करतेवेळी करंट लागल्याने लहान जावासह मोठ्या जावेचाही मृत्यू🌟 पुर्णा (दि.२६ मार्च २०२५) : - पुर्णा तालुक्यातील गौर गावातील नवी आबादी परिसरात आज बुधवार दि.२६ मार्च रोजी दुपारी १२.०० ते १२.३० वाजेच्या सुमारास रमजान ईद निमित्त घरातील साफसफाई करीत असतांना गर्मी सुरू असल्याने कुलर लावत असतांना कुलरमध्ये शॉक उतरल्याने कुलरला चिपकून लहान जावेचा भयंकर शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला यावेळी आपल्या लहान जावाला काय झाले म्हणून तिला पाहण्यासाठी गेलेल्या मोठ्या जावेने तिला स्पर्श करताच तिचा देखील जबर शॉ…
🌟 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार रविंद्र वायकर यांच्या संकल्पनेतून दिल्लीत भरणार हापुस अंबा महोत्सव🌟 दिल्लीकरांना लवकर अस्सल देवगड आणि रत्नागिरी हापूस आंब्याची चव चाखायला मिळणार आहे. शिंदेसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्या संकल्पनेने दिल्लीत आंबा महोत्सव साजरा होणार आहे. या आंबा महोत्सवाच्या उद्घाटनास उपस्थित राहण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्त्वता मान्यता दिली आहे. ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवडल्यामुळे त्यांनी या महोत्सवाला येण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती खासदार रविंद्र वायकरांनी दिली. दिल्लीतील …
🌟 आदित्य ठाकरे रिया चक्रवर्ती आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल 🌟 ✍️ मोहन चौकेकर * महाराष्ट्र राज्य :- ◆ _महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी ASI अंतर्गत शिवरायांचे किल्ले राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्याची केली मागणी_ ◆ _अभिनेता सोनू सूद याची पत्नी सोनाली कार अपघातात भीषण जखमी; मुंबई-नागपूर महामार्गावर दुर्घटना_ ◆ _आदित्य ठाकरे रिया चक्रवर्ती आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल ; दिशा सालियान हिच्या वडिलांकडून नव्याने चौकशीची मागणी_ ◆ _प्रशांत कोरटकर मागच्या दाराने कोर्टात हजर, कोल्हापूरकरांनी दाखवलं पायतान_ ◆ _कुणाल कामरा विरुद्ध एफआयआर…
🌟त्यांचा एकूण पगार किती अन् कोणत्या सुविधा मिळतात ते जाणून घेऊ या...🌟 ✍️ मोहन चौकेकर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना ओव्हरटाइम पगार देण्याची घोषणा केली. दोन्ही अंतराळवीर 5 जून 2024 रोजी नासाच्या संयुक्त 'क्रू फ्लाइट टेस्ट मिशन'वर गेले होते. हे मिशन 8 दिवसांचे होते, परंतु अंतराळयानाच्या थ्रस्टरमध्ये बिघाड झाल्यामुळे ते 9 महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) अडकून राहिले. एलॉन मस्क यांच्या अंतराळयानाच्या मदतीने 19 मार्चला त्यांना सुखरुप परत आणण्यात आले. 💫 नासा अ…