🌟कारागीर आहात पण भांडवल नाही ? मग पीएम विश्वकर्मा कौशल्य योजनेचा लाभ घ्या.....!


🌟जिल्ह्यातील कारागिरांना मिळणार 2 लाखापर्यंत कर्ज🌟

वाशिम :- प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नोंदणीकृत पात्र कारागिरांना कौशल्य विकास प्रशिक्षण, टूलकिट प्रोत्साहन अनुदान रु. 15 हजार आणि रु.  2 लाखापर्यंत सवलतीच्या व्याजदराचे कर्ज मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अंमलबजावणी समितीच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी एस. भुवनेश्वरी आणि सह-अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी केले आहे.


महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ वाशिम या विभागामार्फत या योजनेची अमलबजावणी करण्यात येत असुन याकरीता जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली "जिल्हा अंमलबजावणी समिती” गठीत करण्यात आली आहे.जिल्ह्यातील अवजारे व साधने यांचा वापर करणारे कारागीर तसेच हातांनी काम करणार्‍या पारंपारिक कारागीर तसेच हस्तकलेच्या लोकांना ओळख प्राप्त करुन देण्यासाठी आणि त्यांना सर्वागीण आधार देऊन त्यांचा विकास करण्यासाठी भारत सरकारने 'प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या नावाची नवीन योजना मंजूर केली आहे. कारागिरांच्या उत्पादनांची गुणवत्ता, व्याप्ती आणि पोहोच सुधारणे आणि त्यांया सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना बाजरपेठ मिळवून देऊन त्यांचे मूल्य साखळीसोबत एकत्रिकरण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. ही योजना संपूर्णपणे भारत सरकारद्वारे अर्थसहाय्यित आहे.

*योजनेमधुन मिळणारे लाभ :-

पारंपारिक कारागीर म्ह्णून शासनाची मान्यता

विश्वकर्मा म्हणुन प्रमाणपत्र आणि ओळखपत्र 

कौशल्य पडताळणी नंतर प्रशिक्षण

इच्छुक उमेदवार 15 दिवसाचे प्रशिक्षण 

प्रशिक्षणादरम्यान दररोज रु. 500 विद्यावेतन 

टूलकिट प्रोत्साहन : 15,000 रुपये अनुदान

रु. 1 लाख आणि 2 लाख रुपये कर्ज

डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहन

असंघटित क्षेत्रात स्वयंरोजगार तत्त्वावर हाताने अथवा अवजारांनी काम करणारे, नोंदणीकृत कारागीर हे या योजनेचे लाभार्थी लाभार्थी असुन नोंदणीच्या तारखेस लाभार्थ्याचे किमान वय 18 वर्षे असावे असे शासनाचे   निर्देश आहेत.

*पात्र कारागीर / व्यीवसाय:*

सोनार

कुंभार

मोची / शूस्मिथ / पादत्राणे कारागिर

गवंडी

बास्केट / मॅट / झाडू निर्माता / काथ्या चा व्यकवसाय करणे

बाहुली आणि खेळणी निर्माता

न्हालवी

माला निर्माता

परीट

शिंपी

मासेमारी जाळी बनवणारे

आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या सीएससी केंद्रात ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ वाशिमच्या वतीने करण्यात आले आहे.

“तालुका स्तरावरुन गट विकास अधिकारी तसेच गाव पातळीवरील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांनी याबाबत कार्यालयात नोटीस लावुन आपल्या कार्यक्षेत्रातील गरजवंत कारागिरांना या योजनेची माहिती देऊन लाभासाठी प्रोत्साहित करावे.“                                                                 

 – वैभव वाघमारे, मुख्य कार्यकारी 

अधिकारी जिल्हा परिषद वाशिम

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर

मो.8459273206

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या