🌟पुर्णा तालुक्यातील गौर शिवारात शेतातील विद्यूत मोटार लावण्यास गेलेल्या शेतकऱ्याचा करंट लागल्याने मृत्यू.....!


🌟मयत शेतकरी गोविंद मोगले यांच्या पश्चात वयोवृद्ध वडील,पत्नी तिन मुली एक मुलगा असा परिवार आहे🌟 

पुर्णा (दि.१६ डिसेंबर) - पुर्णा तालुक्यातील गौर शिवारात शेतातील विद्यूत मोटार लावण्यासाठी नदीपात्र ओलांडून जात असलेल्या ४६ वर्षीय शेतकऱ्याला विजेचा धक्का लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज शनिवार दि.१६ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली.

या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की गौर येथील अल्पभूधारक शेतकरी गोविंद मारोती मोगले यांचे गौर शिवारातील गट क्रमांक ११९ मध्ये अडीच एकर शेती असून आज शनिवार दि.१६ डिसेंबर रोजी दुपारी १२-०० ते ०१-०० वाजेच्या दरम्यान नेहमी प्रमाणे शेतातील विद्यूत मोटार लावण्यासाठी नदी ओलांडून जात असतांना यावेळी नदीपात्रातून गेलेल्या विद्यूत वाहिनीचा त्यांना झटका लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली सदरील घटनेची माहिती पोलीस पाटील रामकिशन पांचाळ यांनी तात्काळ चुडावा पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरसिंह पोमनाळकर यांना कळवल्याने सपओनइ.पोमनाळकर,पोउपनि.मारोती फड, जमादार डि.सी.काकडे,जिड्डेवाड आदी पोलीस पथकासह लाईनमन लटपटे,लाईनमन कदम यांनी घटनास्थळी भेट दिली यावेळी संबंधित लाईनमन यांनी विद्युत प्रवाह खंडित केल्यानंतर मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर चुडावा पोलिसांनी घटनास्थळ पंचणामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठवला मयत शेतकरी गोविंद मोगले यांच्या पश्चात वयोवृद्ध वडील,पत्नी तिन मुली एक मुलगा असा परिवार असून त्यांच्या अकाली मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या