🌟या घटनेमुळे संपूर्ण आहेरवाडीसह पुर्णा तालुक्यात होत आहे हळहळ व्यक्त🌟
पुर्णा (दि.२८ सप्टेंबर २०२४) :- पुर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथील २८ वर्षीय तरूण शेतकरी सचिन दासराव मोरे यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज शनिवार दि.२८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११.३० च्या दरम्यान घडली असून या घटनेमुळे संपूर्ण आहेरवाडीसह पुर्णा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे
याबाबत अधिक माहिती अशी की आज शनिवार दि.२८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी आहेरवाडी येथील तरुण शेतकरी सचिन शेतात काम करीत असतांंना अचानक त्याच्या उजव्या पायाच्या बोटाला गवतात सर्पदंश झाला यानंतर त्याला पूर्णा येथील वाघमारे हॉस्पिटल या खाजगी उपचारासाठी नेले असता उपचारा दरम्यान डॉ.विनय वाघमारे यांनी त्यास संपूर्ण शरीरात विष भिडल्यामुळे मृत्यू झाल्याचे घोषीत केले.
मयत शेतकरी सचिन दासराव मोरे यांच्या पश्चात पत्नी,तीन महिन्याची मुलगी,आई,तीन बहिणी असा परिवार आहे सचिनच्या अचानक जाण्याने आहेरवाडीसह संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली असून या घटनेची माहिती शेतकरी छगनराव मोरे यांनी दिली आहे......
0 टिप्पण्या