🌟वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील युवकाने अडाण नदीच्या पुरात उडी घेतल्याने गेला वाहून...!


🌟शोधकार्यासाठी आपत्ती व बचाव पथकाचे प्रयत्न सूरू🌟


फुलचंद भगत

वाशीम:- वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपिर तालुक्यातील शेलुबाजार येथिल गोलू अरुण प्रधान वय ३० वर्ष यांने दि.२ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान शेलुबाजार येथिल सतिआई मंदिराकडे जाणाऱ्या आठवडी बाजाराच्या पुलावरून अडाण नदीपाञात उडी मारल्यामुळे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे.


  यूवक पुराच्या पाण्यात वाहून गेला असल्याचे सदर घटनेची माहिती मिळताच मंगरूळपीर च्या तहसीलदार शितल बंडगर यांनी शोध घेण्यासाठी पिंजर येथील संत गाडगे बाबा शोध व बचाव पथकास पाचारण केले असून, शोध घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र नदीला पुर असल्याने आणि रात्रीची वेळ असल्यामुळे बचाव पथकाला शोध घेण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. 


घटनास्थळी तहसीलदार शितल बंडगर, पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन वाघमोडे, यांच्यासह अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन घटनेची सविस्तर माहिती घेऊन, पुढील कारवाई करत आहेत.बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्या मार्गदर्शनात अतुल उमाळे,गोपाल गीरे, अपूर्व चेके,शुभम भोपळे, दत्ता मानेकर, राम भोपळे, सागर डाके, रोषन झामरे हे शोधकार्य करीत आहेत.वृत्त लिहिपर्यत पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध लागला नव्हता.....

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशीम

मो.8459273206

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या