🌟ओबीसी आणि सोनार समाजाशी निगडित विविध विषयांवर झाली सकारात्मक चर्चा🌟
नाशिक (प्रतिनिधी) - आज दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी १ ते १.४० दरम्यान सकल भारतीय सोनार समाज संघटनेचे सेतुबंधन मध्ये समाविष्ट असलेल्या सोनार समाजाचे ढाण्या वाघ तसेच ओबीसी सुवर्णकार समिती महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष श्री गजुभाऊ घोडके, श्री राजाभाऊ सोनार,दिलिपतात्या देवरे,युनिव्हर्सल विश्वकर्मा फाउंडेशन चे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री शांतारामशेट दुसाने,श्री प्रदिप सोनवणे,युवा सोनार सराफ व्यावसायिक श्री प्रसाद संजयशेट मंडलिक या शिष्टमंडळाने ओबीसी नेते श्री छगनराव भुजबळ यांची नाशिक येथील भुजबळ फार्म हाऊसवर ओबीसी आरक्षण अस्तित्वाची लढाई आणि सोनार समाजाशी निगडित विविध विषयांवर चर्चा केली.
ना श्री छगनराव भुजबळ यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेताना ओबीसी आरक्षण अस्तित्वाचे लढाईसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या नाशिक येथील सोनार समाजाचे लढवय्ये कार्यकर्ते आणि ढाण्या वाघ श्री गजुभाऊ घोडके यांचे विशेष कौतुक करताना त्यांच्या पाठीशी सर्व शाखीय सोनार समाज असल्याचे कळताच त्यांनी विशेष आनंद वाटला यावेळी तब्बल ४० मिनिटे झालेल्या चर्चेत सोनार समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत देखील जाणून घेतले.स्वातंत्र्यपूर्व हिंदुस्थानचे शिल्पकार आणि वादातीत द्रष्टा विकासपुरुष नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस ला देण्यात यावे, संपूर्ण भारतातील सर्व रेल्वे टर्मिनस वर *नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांचे तैलचित्र लावण्यात यावे, सोनार समाजातील व्यावसायिक आणि सराफांवर चोरीचे खोटे आरोप ठेवून होणाऱ्या कारवाईतून सोनार व्यावसायिक आणि सराफांची सोडवणूक व्हावी, पंढरपूर येथील श्री पांडुरंग मंदिरात *हरिहर ऐक्य साक्षात्कार दिनी सोनार समाजाला महाआरतीचा मान मिळावा,संत शिरोमणी श्री नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाचे मागणीसाठी सर्व ओबीसी समाज आपल्या पाठीशी राहील असे आश्वासन देतानाच ओबीसी एल्गार सभांमध्ये सोनार समाजाला व्यासपीठावर अवश्य प्रतिनिधित्व दिले जाईल सोनार समाज हा ओबीसी प्रवर्गातील महत्त्वाचा घटक असून, त्याकडे आम्ही कधीही दुर्लक्ष करणार नाही, शिधा पत्रिका विषयक सोनार समाजातील कुटुंबांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी योग्य त्या यंत्रणांकडे पाठपुरावा केला जाईल, असेही ना. श्री. भुजबळ यांनी सांगितले.....
0 टिप्पण्या