🌟पुर्णेतील श्री गुरू बुध्दीस्वामी महाविद्यालय परिसरात २२ वर्षीय तरुणाची तलवारीने वार करीत निर्घृण हत्या....!🌟घटनास्थळी दोन दुचाकी वाहनांसह अग्नीशस्त्र देखील आढळले : पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल🌟

पुर्णा (दि.०८ डिसेंबर) - पुर्णा शहरातील श्री श्री गुरू बुध्दीस्वामी महाविद्यालय परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी तिश्न शास्त्राने हल्ला चढवत २२ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या केल्याची दुर्दैवी घटना आज शुक्रवार दि.०८ डिसेंबर रोजी अंदाजे दुपारी ०२-०० ते ०२-१५ वाजेच्या सुमारास घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली.

पुर्णा शहरातील आदर्श कॉलनी भागात असलेल्या श्री गुरू बुध्दीस्वामी महाविद्यालय परिसरात अंदाजे दुपारी ०२-०० ते ०२-१५ वाजेच्या सुमारास झालेल्या या निर्घृण हत्येच्या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आकाश उर्फ लल्ला गणेश कदम राहणार गणपती मंदिर परिसर असे असल्याचे समजते.सदरील घटनेची माहिती मिळताच पुर्णा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक प्रदीपजी काकडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक शिंदे आपल्या पथकासह घटनास्थळी रवाना झाले यावेळी पोलीस निरीक्षक प्रदीपजी काकडे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन श्वानपथकासह ठसे तज्ञांना देखील पाचारण केल्याचे समजते दरम्यान घटनास्थळी दोन दुचाकी वाहनांसह एक अग्नीशस्त्र (बंदूक) व गोळी देखील आढळून आल्याचे पोलिस सुत्रांकडून समजते दरम्यान या घटनेची सखोल चौकशी पोलीस प्रशासन करीत असून पो.नि.प्रदिप काकडे व त्यांच्या पथकाने मयत तरुणाचा मृतदेह घटनास्थळ पंचणामा करुन उत्तरीय तपासणीसाठी शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठवल्याचे समजते सदरील घटना कोणत्या कारणासाठी झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नसून पुर्णा पोलीस प्रशासन पुढील तपास करीत आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या