🌟पुर्णा रेल्वे पॉवर हाऊसच्या मागील मोकळ्या परिसरात संशयास्पद स्थितीत आढळला रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह....!


🌟शहरात संशयास्पद स्थितीत महिला मृतदेह आढळण्याची आठवडाभरातील दुसरी घटना : शहरात सर्वत्र भितीचे वातावरण🌟 

पुर्णा :- पुर्णा शहरासह रेल्वे स्थानक परिसरात सातत्याने गुन्ह्यांचे गंभीर प्रकार घडत असून पुर्णा-झिरोफाटा मार्गावरील गॅस एजन्सी परिसरातील मनोज बेंद्रे यांच्या साई ढाब्याच्या मागील बाजूला असलेल्या नाल्यात एका अनोळखी महिलेचा अत्यंत कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह तरंगत असल्याची घटना दि.०६ सप्टेंबर २०२४ रोजी उघडकीस आली होती या घटनेला आठ दिवसांचा कालावधी उलटला नाही तोच आज शनिवार दि.१४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ०९.३० ते १०.०० वाजेच्या सुमारास पंचशील नगर/विजय नगर परिसरालगत असलेल्या रेल्वे पॉवर हाऊस मागील मोकळ्या मैदानावरील झाडाझुडुपांमध्ये एका ४० वर्षीय महीलेचा अर्धनग्न अवस्थेतील रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ माजली असून पुर्णा रेल्वे स्थानकासह रेल्वे परिसरातील झाडाझुडुपांनी गजबजलेल्या मोकळ्या मैदानात गुन्हेंगारांसह गंजेटी गर्दुल्ले तसेच नशेडी दारुड्यांचे वाढलेले प्रस्थ परिसरातील नागरिकांसह पोलिस प्रशासनासाठी देखील कायमची डोकेदुखी ठरत आहे.

या घटनेचे गांभीर्य ओळखून परिसरातील मा.नगरसेवक विरेश कसबे यांनी तात्काळ पुर्णा पोलीस प्रशासनाशी संपर्क साधल्याने पुर्णा पोलीस निरीक्षक विलास गोबाळे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले घटनास्थळी बघ्यांनी एकच झुंबड उडाली दरम्यान पुर्णा रेल्वे स्थानक व तडीपार परिसरासह रेल्वे वसाहतींच्या आसपासचा परिसर मोठ्या प्रमाणात झाडेझुडप वाढल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींसह गंजेटी दारुड्यांसाठी जणू चंबलच्या खोऱ्यासमान झाल्याचे निदर्शनास येत आहे यापुर्वी देखील या प्रकरणात अनेक गंभीर गुन्हे घडले असतांना देखील नांदेड दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनातील अधिकारी या परिसरासह रेल्वे प्रवासी तसेच रेल्वे अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या सुरक्षाव्यवस्थेचा दृष्टिकोनातून पर्यायी उपाययोजना करण्यास तयार नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

रेल्वे पॉवर हाऊसच्या मागील झाडा झुडपांनी गजबजलेल्या मोकळ्या मैदानावर आज शनिवार दि.१४ सप्टेंबर रोजी आढळून आलेल्या अंदाजे ४० वर्षीय महीलेचा डोक्यात तोंडावर गंभीर मारहाणीच्या जखमा असलेला संशयास्पद स्थितीतील रक्तबंबाळ अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण करीत असून शहरात संशयास्पद स्थितीत महिला मृतदेह आढळण्याची जणू मालिकाच सुरू झाली की काय ? असा गंभीर प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे घटनेचे गांभीर्य ओळखून पूर्णा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक विलास गोबाडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे,फौजदार केंद्रे,जमादार,रमेश मुजमुले, सपोऊपनि अण्णा माने,पोकॉ.अजय माळकर बंडू राठोड, संदिप चौरे, पोकॉ. घारगीळ,पो.कॉ.रंगनाथ दुधाटे, पवन लांडगेवाडवा रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक राव आदींनी तात्काळ घटनास्थळी धावले व त्यांनी घटनास्थळ पंचनामा करीत मयत महीलेचा मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय पुर्णा याठिकाणी रवाना केल्याचे समजते यावेळी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने श्वास पथकासह ठसे तज्ञांना प्राचारण करण्यात आले पोलिसांनी सदर अज्ञात महीलेची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू करताच सदरील महीला ही येथील सिद्धार्थ नगर येथील रहिवासी असल्याचे प्रार्थमिक दृष्ट्या निष्पन्न झाले आहे.

सदरील महिलेला कोणी व कशासाठी जिवे मारले याचा तपास पोलीसांनी सुरू केला असून, मारेकऱ्यांच्या शोधकामी पथकं रवाना करण्यात आल्याचे समजते या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जिल्ह्यातील सहाय्यक पोलिस अधिक्षक जिवन बेनिवाल,स्थानिक गुन्हा शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक घोरबांड,केंद्रीय गुप्तचर विभागाचे वाघमारे,आदींनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली आहे...... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या