💥पुर्णेत महायुतीचे उमेदवार विशाल कदम यांच्या प्रचारार्थ आज शहरात प्रचारफेरी संपन्न...!


💥शिवसेना शहरप्रमुख मुंजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी मतदारांशी साधला प्रत्यक्ष संवाद💥 

पुर्णा/गंगाखेड विधानसभा मतदार संघातील शिवसेना-भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार विशाल विजयकुमार कदम यांच्या प्रचारार्थ आज मंगळवार दि.१५ आक्टोंबर रोजी सकाळी ७-३० वाजेच्या सुमारास शहरातील शिवसेना-भाजप महायुतीच्या शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिकांनी भाजप शहराध्यक्ष अजय ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली आणी शिवसेना शहर प्रमुख संकेत उर्फ मुंजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी प्रचार संवाद फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी नगर (कदम गल्ली),नवी आबादी,जगदंबा नगरी,डोबी गल्ली,कोळी वाडा,भगतसिंघ चौक,सराफा बाजार,श्रीराम नगर,दत्त मंदिर परिसर,लोकमान्य टिळकरोड,मुख्य बाजारपेठ परिसरातील मतदारांना डोअर टु डोअर भेटी देऊन मतदारांना प्रत्यक्ष संवाद साधून त्यांना शिवसेना-भाजप महायुतीचे वचननामे देऊन महायुतीचे तरुण तडफदार उमेदवार विशाल कदम यांना निवडून देऊन गंगाखेड विधानसभा मतदार संघाचा संपूर्ण विकास घडवून आणावा असे आवाहन यावेळी शिवसेना शहरप्रमुख मुंजाभाऊ कदम व भाजपचे शहराध्यक्ष डॉ.अजयसिंह ठाकूर यांनी यावेळी मतदारांनी त्यांना उस्फूर्त प्रतिसाद देऊन महायुतीचे उमेदवार विशाल कदम निवडून देण्याचे अभिवचन दिले या प्रसंगी त्यांच्या सोबत नगरसेवक शामभाऊ कदम,युवासेना शहर प्रमुख विकास वैजवाडे,युवासेना शहर संघटक विद्यानंद तेजबंद,कल्याण कदम,रामा पारवे,श्रीनिवास तेजबंद,राकेश पवार,अमर यादव,गणेश पवार,विजु यादव,सचिन वाघमारे,अविनाश चौधरी,पवन कदम,बालाजी कुर्हे आदींसह शिवसेना-भाजप महायुतीचे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या