💥उमरखेड तालुक्यातील चुरमुरा पारडी येथे सहा वर्षीय बालिकेवर नराधमाने केला अतिप्रसंग..!



💥उमरखेड पोलीस स्थानकात आजीने दिलेल्या तक्रारी वरुन गुन्हा दाखल आरोपी नराधम फरार💥

उमरखेड/अंगणात खेळत असलेल्या सहा वर्षाच्या चुलत मामाच्या मुलीला खाऊ देतो म्हणून गावालगतच्या टेकडीवर नेऊन तिच्यावर लैंगीक अत्याचार केल्याची घटना शहरापासून सुमारे १४ कि .मी. अंतरावर असलेल्या चुरमुरा पारडी येथे १३ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ७-३० वाजताचे सुमारास घडली.घटनेची तक्रार बालीकेच्या आजीने उमरखेड पोलीस स्टेशनला दिल्यावरून या घटनेची गंभीर दखल घेत पोलीसांनी आरोपी मंगल भारत राठोड वय  २२ वर्षे रा . चुरमुरा याचे विरुद्ध भादंवि ३७६ ( १),३७६ ( २ ) तसेच सहकलम  ४, ६ , ८  पोस्कोअंतर्गत   गुन्हा दाखल करण्यात आला आहे . उपविभागीय पोलीस अधिकारी विकास तोटावार यांच्या मार्गदर्शनात  ठाणेदार अनिल किनगे व पो . उपनिरीक्षक श्रीमती पगलवाड या पूढील तपास करीत आहेत .आरोपी फरार असून पोलीस आरोपीच्या शोधात आहेत...

Post a Comment

0 Comments