💥परभणीचे लोकप्रिय खासदार संजय जाधव यांच्या सभेसह रॅलीला प्रचंड जनसमुदायाची उपस्थिती..!💥विरोधकांच्या कुठल्याही अमिशाला बळी न पडता महायुतीचे उमेदवार विशास कदम यांना निवडून द्या - खा.जाधव
 
पालम :-  पालम तालुक्यातील पेठशिवणी येथे आज परभणी चे खासदार संजय जाधव यांनी गंगाखेड विधानसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार विशाल कदम यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली.कुठल्याही अमिषाला बळी पडू नका व स्वाभिमानाने गंगाखेड विधानसभेवर भगवा फडकविण्याचे आवाहन त्यांनी सभेत केले.  सभेनंतर पेठशिवणी येथे पायी प्रचार फेरी काढली. या सभेला व  प्रचार फेरी  ला पेठशिवणीकरांनी  प्रचंड प्रतिसाद दिला.  यावेळी खासदार जाधव  यांच्यासोबत विशाल कदम, शिवसेना  माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव , भाजपा नेते गणेशराव रोकडे,रबदडे मामा, व्यंकट तांदळे ,डाॅ.उंदरे पाटील, भागवत बाजगीर,  तुकाराम पाटील, शिवसेना तालुकाध्यक्ष हनुमंतराव पौळ,  शहराध्यक्ष गजानन पवार, युवासेना अध्यक्ष ओमकार शिरस्कर, निराधार संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत कराळे, उपतालुकाप्रमुख शिवाजी खंडागळे, अर्जुन डोंगरे, बाळासाहेब लोखंडे, माऊली पवार, सह सेना-भाजप महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या