💥जिल्ह्यातील मानवत पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक रमेश स्वामी यांचीही पोलिस नियंत्रण कक्षात रवानगी💥
परभणी (दि.२६ जुलै २०२१) - पूर्णा येथील प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष राठोड व मानवत पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक रमेश स्वामी यांची पोलिस नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या बदलीमागील कारण काय हे मात्र कळाले नाही.
अलिकडेच सेलू येथील पोलिस निरीक्षक रामेश्वर तट यांनाही पोलिस नियंत्रण कक्षात हलविण्यात आले होते. त्याआधी कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गुलाबराव बाचेवाड यांनाही पोलिस नियंत्रण कक्षात हलविण्यात आले.
जिल्हा पोलिस दलात एकापाठोपाठ एक बदल्यांच्या या सत्राने खळबळ उडाली आहे.

0 Comments