💥नव्या शिवभोजन वाहनाचे लोकार्पण जिल्हाप्रमुख आ.अंबादास दानवे यांच्या हस्ते अभिनय टॉकीज समोर करण्यात आले💥
संभाजीनगर /औरंगाबाद (दि.२७ जुलै २०२१) - कोविड च्या काळात गोरगरिबांना पोटभर जेवण मिळावे या उदात्त हेतूने शिवभोजनाची सुरुवात करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अत्याधुनिक सुविधा असलेल्या नव्या शिवभोजन वाहनाचे लोकार्पण शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते अभिनय टॉकीज समोर करण्यात आले या कार्यक्रमांचे आयोजक शिवसेना उपशहरप्रमुख राजेद्र दानवे, रवींद्र लोढा होते.याकार्यक्रमास सामाजिक कार्य करणारे श्री खिंवसरा काका, कडवा पाटीदार समाजाचे बाबूभाई पटेल,जैन कॉन्फरन्सचे मदनलाल लोढा, शहरप्रमुख विजय वाघचौरे, विभागप्रमुख सतिष कटकटे,नरेश भालेराव,संजय लोहिया,शाखाप्रमुख रणजित दाभाडे,जगदीश वेताळ,युवासेनेचे सचिव धर्मराज दानवे,प्रकाश कामलानी, समर्पित सेवा मंचचे प्रसाद पाटणी,किरण कुलकर्णी,जितेंद्र पटेल, दर्शन पाटणी यांची उपस्थिती होती.

शिवभोजनाच्या मार्फत गोरगरिबांना पोटभर अन्न मिळावे आणि त्यांचा आशीर्वाद राज्याचे मुख्यमंत्री मा. उध्दव साहेब ठाकरे यांना मिळून या महाराष्ट्र राज्याची सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रगती व्हावी अशा शुभेच्छा व्यक्त करत शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी शिवभोजनच्या अद्यावत वाहन लोकार्पण केले. शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे पुढे बोलतांना म्हणाले की, निवडणूक होण्याअगोदर शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात कोणताही गोर-गरीब उपाशी राहू नये असे सांगत शिवभोजन सुरू करण्याबाबत शिवसैनिकाना आदेश दिले होते. या आदेशानुसार २७ जुलै २०१७ या वर्षी शिवभोजन ची पहिली सुरुवात संभाजीनगर मध्ये मी पुढाकार घेऊन शिवसैनिकांच्या मदतीने सुरू केली. या शिवभोजनाची सुरुवात केल्याने अनेक गोर-गरिबांना पोटभर जेवणाचा आधार मिळाला. कोरोनाच्या संसर्ग काळातही ही सेवा अविरतपणे शिवसैनिकांनी सुरूच ठेवली. शिवभोजनाचा लाभ प्रत्येक गरजू माणसाला घेता यावा यासाठी अत्याधुनिक सुविधा असलेल्या वाहनाचे आज लोकार्पण केले असून शिवभोजनाचा लाभ गोर-गरीब, कामगार, वाहनचालक, हमाल, मजूर यांनी घ्यावा असे आवाहन आमदार अंबादास दानवे यांनी केले.....
✍️ मोहन चौकेकर
0 Comments