💥ज्योतिनगर वार्डात रस्त्याचे काम मार्गी लावल्याचे समाधान -- आमदारअंबादास दानवे.....!


💥ज्योतिनगर येथील रस्त्याच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते💥

✍️ मोहन चौकेकर

संभाजीनगर (दि.२७ जुलै २०२१) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ५४ लक्ष रुपय निधीतून सह्याद्री कॉर्नर ते विश्वरूप हॉल दरम्यान असलेल्या सिमेंट कॉंक्रेटिकरण रस्त्याचे लोकार्पण माझ्या हस्ते झाले याचा मनस्वी आनंद होत असून पुढील वर्षी आणखी १ कोटी रुपयांची तरतूद करून विकास निधी ज्योतिनगर वार्डसाठी आणेल असे अभिवचन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी दिले. ज्योतिनगर येथील रस्त्याच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. 


पुढे बोलतांना आमदार दानवे म्हणाले की, मला सर्वात समाधानकारक काम करायला मिळाले ते या ज्योतिनगर मध्ये. माझ्या एकंदर कामात अत्यंत महत्वाचे काम म्हणजे ज्योतिनगर वार्डाचे असे मी मानतो. कोविड परिस्थिती असतानाही विकासकामे करण्याचा वेग शिवसेनेच्या सरकारने केला आहे. गेल्या वीस वर्षापासून ज्योतिनगर वार्डात रस्त्याचे काम मार्गी लावल्याचे अत्यंत समाधान वाटते. मागील सरकारच्या काळात केवळ पाईपलाईन झाल्या मात्र जलकुंभ झाले नव्हते मात्र शिवसेना सरकरच्या कार्यकाळात जलकुंभ तसेच १६८० कोटी रुपये निधीची जलवाहिनी मार्गी लावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे या शहरावर विशेष प्रेम असल्याचे यावरून सिद्ध होते. वार्डात १ कोटी रुपयांचा निधीतुन विविध विकासकामे यावर्षी होत असून आणखी विविध विकासकामांसाठी १ कोटी रुपयांचा निधी ज्योतिनगर वार्ड साठी मी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन आमदार अंबादास दानवे यांनी दिले. 

💥माजी सभागृह नेते गिरजाराम हळनोर बोलताना म्हणाले की :- 


ज्योतिनगर वार्डात निधीअभावी अनेक विकासकामे प्रलंबित होती. त्यामुळे येथील नागरिकांना रस्त्याबरोबरच इतरही मूलभूत सोयी सुविधांअभावी मनस्ताप सहन करावा लागत होता. मात्र शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी नागरिकांच्या अडचणींची दखल घेऊन भरीव निधी उपलब्ध करून दिला याबद्दल त्यांचे आभार

💥तसेच यावेळी बोलताना अॅड मुरार देशपांडे म्हणाले की :- 

गेल्या वीस वर्षांपासून रस्त्याअभावी आम्ही नरकयातना सहन करत होतो. ज्योतिनगर वार्डात सर्वच प्रतिष्ठित नागरिक राहत असल्याने आणि वार्डातील मुख्य रहदारीचा रस्ता असल्याने याबाबत अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. नागरिकांची ही गैरसोय लक्षात घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी ५४ लाखांचा निधी उपलब्ध करून देत मुख्य रस्ता पूर्णत्वास नेला त्याबद्दल त्यांचे शतशः आभार.

💥तसेच यावेळी ज्येष्ठ पत्रकार बाबा गाडे बोलतांना म्हणाले की :- 



ज्योतिनगर वार्डात मुख्य रस्त्याची चाळणी झाली होती. त्यामुळे नागरिकांना मोठ्या खड्यांचा सामना करावा लागत होता. अनेकांना कंबर आणि पाठीचा त्रास सहन करावा लागल्याने जेष्ठ नागरिकांचेही आरोग्य धोक्यात आले होते. शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांचे या वार्डावर विशेष प्रेम असल्याने त्यांनी तातडीने निधी उपलब्ध करून दिल्याने येथील नागरिकांचा प्रवास आता सुखकर झाला आहे. याबद्दल आमदार अंबादास दानवे यांचे आभार मानवे तेवढे थोडेच आहे. 

 याप्रसंगी शहरप्रमुख विजय वाघचौरे,  महिला आघाडीच्या उपशहर संघटक अरुणाताई भाटी , विभागप्रमुख सुधीर चौधरी,  ज्येष्ठ पत्रकार बाबा गाडे , ज्योतीनगर प्रभागाच्या मा.नगरसेविका सौ सुमित्रा हाळनोर माजी सभागृह नेता गिरजाराम हाळनोर  प्राध्यापक संतोष बोर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमास  उपशहरप्रमुख  प्रमोद ठेंगडे  , राजू दानवे , नरेश भालेराव , प्रकाश कमलानी विश्वनाथ राजपूत बाळासाहेब दानवे अभिजीत पगारे इत्यादी  मान्यवरांची उपस्थिती होती तसेच या विभागातील उपविभागप्रमुख अविनाश कुलकर्णी  ,  शाखाप्रमुख महेंद्र जागीरदार ,  महिला आघाडीच्या  शाखा संघटक सपर्णा चिंतलवार , युवासेना उपशहर अधिकारी देविदास रत्नपारखी  ,   उपविभाग संघटक सौ पुष्पा ढाकणे ,  गटसंघटक निता महाजन  ,  माजी शहर संघटक सुनीला क्षत्रिय ,  उपशाखा संघटक सुलोचना मगारे , गट संघटक सविता हाळनोर , राधा गायकवाड ,पुष्पा चव्हाण त्याचप्रमाणे  प्रभागातील ज्येष्ठ नागरिक ऍड. मुरार देशपांडे निवृत्त न्यायाधीश काळेसाहेब , नेमाडे काका , रामेश्वर हुरने अप्पा , वसंत बोरोले , सदानंद शेळके , प्राध्यापक  किनारीवाला सर,  शिवानंद वाडकर , सुधीर बाहेकर, महेंद्र पळसकर  , विश्वनाथ चव्हाण ,  मनोज घोडे , रामनाथ ठोंबरे ,बांधकाम व्यवसायिक प्रा प्रमोद खैरनार , पापा गोयल, नाना पाटील , सुनील बेदमुथा, उपशाखाप्रमुख प्रकाश मगारे  , मंगेश कपोते , पवन साबू , शिवप्रकाश मिटकरी , प्रमोद जोशी , दिलीप चिमखडे , गटप्रमुख बंडू मोरे नारायण गाडेकर अशोक गायकवाड पंडित सोनवणे ,  समाधान मोरे , किशोर कल्याणकर , आयुष लंके , रामसिंग होलिया , मनोज खोचे , जगदीश चव्हाण  , कांतीलाल भाटी , राहुल दारवेकर आदींची उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संतोष बोर्डे यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रकाश  मगारे ,प्रशांत घोडके , बापू जहागीरदार , अमोल मस्के , प्रमोद जोशी इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले....

 ✍️ मोहन चौकेकर

Post a Comment

0 Comments