💥परंडा तालुक्यातील जेकटेवाडीतील एका वाळू वाहतूक करणाऱ्या विक्रेत्यास वाळूचा व्यवसाय चालू करण्यासाठी पैशाची मागणी💥
उस्मानाबाद (प्रतिनीधी) :- दर महिना लाखांची हप्ता रुपी लाच - भूमच्या उपविभागीय अधिकारी मनीषा राशीनकरसह एकजण अटकेत विना कारवाई वाळू व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी घेतली लाच, मोठा मासा जाळ्यात भूम येथील उपविभागीय अधिकारी मनीषा राशिनकर यांच्यासह एका जणाला उस्मानाबाद येथील लाचलुचपत विभागाने कारवाई करीत अटक केली.
परंडा तालुक्यातील जेकटेवाडी येथील एका वाळू वाहतूक करणाऱ्या विक्रेत्यास वाळूचा व्यवसाय चालू करण्यासाठी पैशाची मागणी करण्यात आली होती एक लाख 10 हजार रुपयांची दरमहा हप्तारुपी लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे उस्मानाबाद लाचलुचपत विभागाच्या या कारवाईत महसूल विभागाचा एक वरिष्ठ दर्जाचा एक मोठा मासा जाळ्यात अडकल्याने खळबळ उडाली आहे उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध वाळू व्यवसाय तेजीत सुरू असून अधिकारी यांना दरमहा लाखो रुपयांची लाच द्यावी लागते हे या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे.
भूम येथील उपविभागीय अधिकारी मनीषा राशीनकर यांच्यासह एका कोतवालास १ लाख १० हजारची लाच प्रकरणी अटक करण्यात आली आहे वाळू व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी दरमहा लाच मागितली होती मनिषा अरुण राशिनकर व कोतवाल विलास नरसींग जानकर यांना अटक करण्यात आली आहे१ लाख १० हजार ची मागणी करून तडजोडी अंती ९० हजार व २० हजार आरोपी जानकर यांच्या हस्ते स्विकारले तक्रारदार यांचा एक टीप्पर व त्याच्या पाहुण्यांचा जे.सी.बी. व तीन ट्रक्टर हे विना कारवाई वाळू वाहतुकीसाठी चालू देण्यासाठी लाच घेतली असून पोलीस ठाणे भुम येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्रभर चालू होती.
सापळा अधिकारी प्रशांत संपते,पोलीस उपअधीक्षक ,ला.प्र.वि. उस्मानाबाद यांनी डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.औरंगाबाद ब्रम्हदेव गावडे, अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. या पथकात पोलिस निरीक्षक गौरिशंकर पाबळे, अंमलदार दिनकर उगलमुगले, विष्णू बेळे, विशाल डोके यांचा समावेश होता उस्मानाबाद येथील एक वरिष्ठ अधिकारी वाळू विक्रेत्याने लाचखोरीत अडकवल्याने आगामी काळात अवैध वाळू विक्रेत्यांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळू नये म्हणजे झाले....

0 Comments