💥या युद्धात सुमारे 2 लक्ष भारतीय सैनिकांनी सहभाग घेतला होता. तर सुमारे 527 सैनिक हुतात्मा झाले💥
✍️ मोहन चौकेकर
🇮🇳 26 जुलै याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. म्हणूनच भारतीय सैन्यासाठी शौर्याचा हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची वीर कहाणी आज जाणून घेऊयात...
🇮🇳 भारत आणि पाकिस्तानमध्ये कारगिलचे युद्ध 1999 मध्ये झाले होते.
या युद्धाची सुरुवात 8 मे 1999 रोजी पाकिस्तानचे सैनिक आणि काश्मिरी अतिरेकी कारगिलच्या शिखरांवर दिसले आणि झाली होती कारगिलमध्ये घुसखोर घुसल्याची माहिती सर्वप्रथम ताशी नामग्याल नावाच्या एका स्थानिक मेंढपाळाने दिली. जे कारगिलमधील बाल्टिक सेक्टरमध्ये आपल्या नवीन याकाचा शोध घेत होते.
सर्वात प्रथम 3 मे रोजीच भारतीय सैनिकांना पहाराकरत असताना आढळले की, काही लोकं तेथे हालचाल करत असल्याचे दिसले. प्रथमच द्रास, काकसार आणि मुश्कोह सेक्टरमध्ये पाकिस्तानी घुसखोरांना बघितले गेले.
🇮🇳 पुढे भारतीय सैन्याने 9 जून रोजी बाल्टिक क्षेत्राच्या 2 चौकीचा तर 13 जून रोजी द्रास सेक्टरमध्ये तोलोलिंगवर ताबा घेतला. आपल्या सैन्याने 29 जून रोजी दोन अन्य महत्त्वाच्या चौक्या 5060 आणि 5100 आणि वर ताबा मिळवून आपला झेंडा रोवला.
तब्बल 11 तासाच्या लढानंतर पुन्हा एकदा टायगर हिल्सवर भारतीय सैन्याने ताबा घेतला, मग बटालिकातील जुबेर हिल देखील ताब्यात घेतले 1999 मध्ये कारगिल युद्धात आर्टिलरी तोफेमधून 2,50,000 गोळे आणि रॉकेट डागले गेले. 300 पेक्षा जास्त तोफ आणि मोटार आणि रॉकेटलॉन्चर्सने दररोज सुमारे 5,000 बॉम्ब डागण्यात आले होते.
🇮🇳 बरोबर 26 जुलै 1999 या दिवशी भारतीय सैन्याने कारगिल युद्धाच्या वेळी राबविलेले 'ऑपरेशन विजय' यशस्वीरीत्या पार पाडून घुसखोरांच्या तावडीतून भारतभूमीला मुक्त केले होते या युद्धात मीराजसाठी अवघ्या 12 दिवसात लेजर गाईडेड बॉम्ब प्रणाली (लेजर मार्गदर्शित बॉम्बं प्रणाली) तयार करण्यात आली भरतीय वायू सेनेने पाकिस्त विरोधात मिग-27 आणि मिग-29 विमान वापरले होते.
या युद्धात सुमारे 2 लक्ष भारतीय सैनिकांनी सहभाग घेतला होता. तर सुमारे 527 सैनिक हुतात्मा झाले होते.,..
✍️ मोहन चौकेकर

0 Comments