💥अव्वल दर्जाचा राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्कार संस्थाध्यक्ष दिपक देशमाने यांनी स्वीकारला💥
✍️ मोहन चौकेकर
चिखली : आर्थिक क्षेत्राला बळकटी देत मागील १८ वर्षापासून सातत्याने ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व अल्पावधीत सर्व आधुनिक सेवा सुविधायुक्त श्री मुंगसाजी महाराज पतसंस्थेला शनिवार दि. २४ जुलै २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन यांच्यामार्फत दिला जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या दीपस्तंभ पुरस्काराने महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे पदाधिकारी व सहकार क्षेत्रातील गणमान्य व्यक्तींच्या हस्ते मोठ्या थाटामाटात शिर्डी येथे सन्मानित करण्यात आले.
राज्यांमधील पतसंस्थेची पुरस्कारासाठी निवड करताना सर्व निकष पूर्ण करीत तसेच ग्राहकांना तत्परतेने उत्कृष्ट सेवा देणाऱ्या श्री मुंगसाजी महाराज पतसंस्थेला अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमधून अव्वल दर्जा प्राप्त केल्याबद्दल तसेच मागील १८ वर्षातील आर्थिक प्रगतीचा उंचावलेला आलेख यासह इतर सर्व बाबी संस्थेच्या प्रगतीला प्रेरक ठरतात अशा प्रेरणादायी श्री मुंगसाजी महाराज पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले. त्यामुळे राज्याच्या सहकार क्षेत्रात श्री मुंगसाजी महाराज पतसंस्थेला नवी ओळख मिळाली आहे, ग्राहकांच्या आर्थिक विकासाला गती देण्याचे व विविध व्यवसायाच्या माध्यमातून अर्थक्रांतीचे नवे धोरण अवलंबून आर्थिक उत्कर्ष कसा साधावा याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणून संस्थाध्यक्ष दिपक देशमाने यांना खऱ्या अर्थाने या पुरस्काराने सन्मानित करताना विशेष आनंद होत असल्याचे उदगार यावेळी काकासाहेब कोयटे यांनी व्यक्त केले.
पतसंस्थेच्या दैदिप्यमान प्रगतीसाठी सदैव कार्यतत्पर असणारे संचालक मंडळ, सल्लागार मंडळ, व्यवस्थापक, कर्मचारी, सहकारी ग्राहक आणि भागीदार यांचा सिंहाचा वाटा असल्याने खऱ्या अर्थाने हे या पुरस्काराचे मानकरी असल्याचे प्रतिपादन संस्थाध्यक्ष दिपक देशमाने यांनी केले. सद्यस्थितीत १२ कार्यरत शाखा तसेच प्रस्तावित ८ शाखा असा प्रचंड मोठ्या प्रमाणात पतसंस्थेचा विस्तार करताना जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात आधुनिक अर्थक्रांतीद्वारे आर्थिक बळकटी देऊन विविध व्यवसायास चालना देण्यासाठी तत्पर असल्याचे मनोगत यावेळी दिपक देशमाने यांनी व्यक्त केले.
अव्वल दर्जाचा राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्कार स्वीकारताना संस्थाध्यक्ष दिपक देशमाने, कन्हैयालाल भोजवाणी, आनंद बोंद्रे,विजय जागृत, दिलीप चवरे, अभय तायडे, चंद्रकांत सुरडकर यासह व्यवस्थापक- व्ही एन ठेंग. शाखाधिकारी, एस.एस.सातव तसेच सदर कार्यक्रमास सहकार क्षेत्रातील अत्यंत तज्ञ अभ्यासू आणि सहकारातील सर्व अधिकारी उपस्थित होते. संस्थेवर प्रेम करणारे ग्राहक, भागधारक, कर्मचारी सहकारी सल्लागार तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे दिपक देशमाने यांनी आभार मानले....
✍️ मोहन चौकेकर


0 Comments