💥शिवसेनेसोबत ठाम राहा, सार्वजनिक विकासकामे आम्ही मार्गी लावू -- आ. अंबादास दानवे


💥शिवसंपर्क मोहिमेचा पूर्व विधानसभा मतदारसंघात झंजावात💥

औरंगाबाद / संभाजीनगर (दि.२५ जुलै २०२१ ) शिवसेना हा पक्ष नसून ही एक शाश्वत संघटना आहे. अडी-अडचणीत असलेल्या सर्वसामान्य माणसाला मदत करणे म्हणजेच संघटन असून प्रत्येकाने शिवसेनेसोबत ठाम रहा असे आवाहन करत नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि सार्वजनिक विकास कामे आम्ही करू अशी ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी दिली. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसंपर्क मोहिमेच्या निमित्ताने पूर्व विधानसभा मतदार संघात रविवारी (दि.२५) आयोजित बैठकीत ते बोलत होते.

शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ११ ते ३१ जुलै दरम्यान राज्यभरात शिवसंपर्क मोहिम राबविण्यात येत असून त्यानुसार शिवसेना प्रवक्ते, जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात संभाजीनगर, पूर्व मतदार संघातील शिवसैनिकांशी रविवारी (दि.२५) संवाद साधण्यात आला. यावेळी संघटनात्मक पक्षबांधणी, शाखा प्रमुख नियुक्त्या, वार्ड रचना बुथ रचना, बुथप्रमुख, गटप्रमुख, सहगटप्रमुख यांच्या नियुक्त्या, पदाधिकारी यांच्या अडीअडचणी, कोरोना मुक्त वार्ड, विभाग विविध विकासकामे याविषयी आढावा घेण्यात आला. 

पुढे बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे म्हणाले की, शिवसैनिकांचे मत स्पष्ट असले पाहिजे. तरुणांनी यंत्रणा, संघटना मजबूत करण्यासाठी प्रत्येक नागरिकांशी संपर्क साधला पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांचे लहान लहान प्रश्न सोडविले पाहिजे. नारेगावत बेरोजगारिचा प्रश्न कोविड काळात उदभवला असला तरी यावर लवकरच उपाय करून तरुणांसाठी नौकरी मेळावा घेण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. औद्योगिक कंपन्याशी संपर्क करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी नारेगाव येथे शिवसंपर्क मोहिमेच्या निमित्ताने आयोजित बैठकीत दिले. 

पूर्व विधानसभा मतदार संघात शिवसंपर्क मोहिमेच्या निमित्ताने आयोजित बैठकीत शिवसेनेचे पूर्व विधानसभा संघटक राजू वैद्य म्हणाले की, विकासकामे झाले पाहिजे, बेरोजगारीचा प्रश्न सुटला पाहिजे, नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा मिळाली पाहिजे यासाठी या शिवसंपर्क मोहिमेतून सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही करू अशी ग्वाही पूर्व विधानसभा संघटक राजू वैद्य यांनी दिली. आगामी काळात शिवसेनेचे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे काम करावे असेही आवाहन राजू वैद्य यांनी केले.

💥आज शिवसेना संपर्क मोहिमेदरम्यान काँग्रेसचे उद्धव सावरे मनसेचे परमेश्वर सगर यांनी शिवसेनेत प्रवेश केला💥

याप्रसंगी पूर्वचे विधानसभा संघटक राजुजी वैद्य शहरप्रमुख विश्वनाथजी स्वामी उपशहरप्रमुख वामनराव शिंदे , दिग्विजय शेरखाने  ,ज्ञानेश्वर डांगे ,मा. उपशहरप्रमुख,विजय वाघमारे,रवि गायकवाड, मा.नगरसेवक आत्माराव पवार, मनोज गांगवे, दामू अण्णा शिंदे, विभागप्रमुख किशोर आवारे,उपविभागप्रमुख दिपक पवार,भिकनराव शेंदूरकर,इंद्रजित जायभाये, विजय अडलक,गणेश कुर्हे, शिवाजी ठेंगडे, खंडू आवटे,शाखाप्रमुख प्रशांत देशमुख,दिलीप झगरे,मा.नगरसेवक भरतभाऊ लकडे,विलासभाऊ जाधव, प्रल्हाद वाघमारे, भागवत भाऊ भारती, विष्णु नाना पुंगळे, सचिन सुलताने, राज मोरे,एकनाथ निबोळकर, सुभाष ठाकरे

 किरण महामुने,शारणप्पा कादरे,अविराज स्वभावने,हर्षकुमार सोनवणे,श्रीकांत कुलकर्णी, निलेश तरटे,दिलीप जायकर,शरणप्पा कदारे,मदन जयस्वाल,सौरभ काळे,शुभम बोरसे,मयूर धनावडे,विशाल ढाकरे,गोविंद शेलार,गोपाल राऊत, लक्ष्मण शर्मा, संदीप मते,आण्णासाहेब कोरडे,विजय पोपळघट,रामदास कांबळे, नवनाथ उगले,शिवाजी चौरे,प्रवीण वाघ,सागर कोहिटे, परमेश्वर ढासळकर,शिवाजी मोरे,राहुल सुरडकर,डॉ बाबासाहेब पैठणे,संजय जैस्वाल,शिवाजी औटे,दिपक शेलार, सतिष बोर्डे,प्रसाद गाडेकर,आकाश पोळ,सोनल आवारे,दिलीप गडपे,सतिष जोगदंड, जनार्दन पाचे,विकास मार्कंडे,किरण मोरे,विशाल विकास नलावडे, तुकाराम तौर, धनंजय पांडे,नितीन काकडे,मनोहर भिंगारे, संतोष धामणे,जगदीश गीते,शेळके काका,पोफळे साहेब, दिलीप जायकर, हनुमान चव्हाण, मदन जयस्वाल .महिला आघाडीच्या संपर्क संघटक कला ओझा, सह संपर्क संघटक सुनीता आऊलवार,जिल्हा संघटक सुनीता देव, शहर संघटक विद्या अग्निहोत्री, उपशहर संघटक संध्या जाधव,सुनीता औताडे, माजी महापौर रुक्मिणी शिंदे युवा सेना जिल्हाधिकारी हनुमान शिंदे उपशहर अधिकारी ज्योतीराम पाटील यांच्यासह ठाकरेनगर, एन-2, जयभवानीनगर, गजानन नगर, भारतनगर या भागातील शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

💥नारेगाव ची शिवसेना आणखी मजबूत होण्यासाठी शिवसैनिकांनी संकल्प करा💥

संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना प्रवक्ते तथा जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी नारेगाव (प) ,सावित्रीनगर पूर्व, सावित्रीनगर , चिकलठाणा, सिडको एन-1,एम आय.डी. सी. चिकलठाणा, ब्रिजवाडी, आंबेडकरनगर  या विभागाची बैठक मारोती मदींर मेनरोड नारेगाव येथे घेऊन शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी नारेगाव ची शिवसेना आणखी मजबूत होण्यासाठी शिवसैनिकांनी संकल्प करा असे आवाहन आमदार अंबादास दानवे यांनी केले. 

यावेळी जेष्ठ शिवसैनिक चंद्रकांत दहिहंडे,विभागप्रमुख नागेश कोळी ,नितीन साळवे ,कृष्णा मेटे उपविभाग प्रमुख महेंद्र ठाकूर रामराव कळंब बाबूलाल बिजारने, सतीश वाघुले ,गौरव बकाल ,रमेश कोल्हे ,विलास खवणे ,शाखाप्रमुख राहुल घोरपडे, प्रभाकर जाधव ,बबलू काळे, नितीन जाधव, भगवान वैरागळ, जगदीश खाडे,

बाबासाहेब गदाई, भजनी मंडळ अध्यक्ष नामदेव गायकवाड, ऊत्तम भाकरे, माजी नगरसेवक महादेव सूर्यवंशी, मनीष दहिहंडे, अशोक मुटे,  दीपक सुर्यवंशी, उप विभागप्रमुख लहू इमले, उपशाखा प्रमूख उमेश नेमाडे, किशोर जाधव, नामदेव गदाई, महिला आघाडीच्या उपशहर प्रमुख सुनीता औताडे  यांच्यासह नारेगाव (प) ,सावित्रीनगर पूर्व, सावित्रीनगर , चिकलठाणा, सिडको एन-1,एम आय.डी. सी. चिकलठाणा, ब्रिजवाडी, आंबेडकरनगर  याभागातील शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती....

✍️ मोहन चौकेकर

Post a Comment

0 Comments