💥“करोना,वादळं,पाऊस उद्धव ठाकरेंचाच पायगुण”; नारायण राणेंचा जोरदार हल्लाबोल💥
✍️ मोहन चौकेकर
1) "शिवसेनीकांनी व नागरिकांनी माझा वाढदिवस साजरा करू नये”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन,मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपले योगदान देऊन सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य पार पाडा, असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
2) नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत केली जाईल, तांत्रिक अडचणी येऊ देणार नाही” – मुख्यमंत्र्यांची घोषणा
3) “काहीही करा, पण आम्हाला उभं करा,”* उद्धव ठाकरेंसमोर पूरग्रस्त महिलेला अश्रू अनावर
4) चिपळूणमधील बाजारपेठेतील रस्त्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीची पाहणी
5) “करोना, वादळं, पाऊस उद्धव ठाकरेंचाच पायगुण”; नारायण राणेंचा जोरदार हल्लाबोल
6) राजीव सातव यांच्या मुलाने दहावीच्या परीक्षेत मिळवले ९८.३३% गुण*; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
7) योगी आदित्यनाथ अयोध्येतून लढणार विधानसभा निवडणूक?*; स्थानिक आमदाराच्या वक्तव्यामुळे चर्चा
8) उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाकडून जोरदार तयारी
9) अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री भारत भेटीत मानवाधिकाराचा मुद्दा मांडणार*
10) भारतात नागरी स्वातंत्र्याचा संकोच झाला असल्याबाबत परराष्ट्रे आणि मानवाधिकार गट यांनी यापूर्वी केलेली टीका भारताने अमान्य केली होती.
11) रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यात दरड कोसळून 89 जणांचा मृत्यू,अजूनही 34 बेपत्ता; NDRF ची माहिती.
12) राज्यात पूर व्यवस्थापन करणारी योग्य यंत्रणा कार्यान्वित करणार*: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याची घोषणा.
13) 'पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात गोळा केलेल्या OBCच्या डेटामध्ये तब्बल 69 लाख चुका; भाजपचा आरोप.
14) केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस* यांच्याकडून दुर्घटनाग्रस्त तळीये गावाची पाहणी, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुनर्वसन करण्याचं राणेंचं आश्वासन.
15) बुलढाणा जिल्ह्यातून गेल्या सहा महिन्यात 480 जण बेपता* झाल्याची धक्कादायक माहिती समोर; महिला आणि मुलींचं प्रमाण लक्षणीय.
16) भविष्यात कोरोना व्हायरसचे अनेक म्युटेशन समोर येतील*; अशा परिस्थितीत कोरोना लसीच्या दुसऱ्या डोस सोबतच बूस्टर डोसचीही गरज; AIIMS प्रमुखांची माहिती.
17) टेबल टेनिस महिला एकेरीत मनिका बत्राचा शानदार विजय;* मनिकाने युक्रेनच्या मार्गारिटाला 4-3 असं केलं पराभूत.
18) भारताची बॉक्सिंग सुपरस्टार मेरी कोमनं* टोकियो ऑलिम्पिकमधील मिळवला आपला पहिला विजय; पदकाच्या दिशेनं एक पाऊल पुढे...
. ✍️ मोहन चौकेकर

0 Comments