💥या शिबिरात डॉक्टर शीतल मालू यांनी महिलांची तपासणी केली💥
हिंगोली ; जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार साहेब व आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब यांच्या आदेशानुसार व राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष सौ.रुपाली चाकणकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आठवडाभर राबविण्यात येत आहे.
त्यानुसार शिरडशहापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दि .23 जुलै रोजी हिंगोलीच्या राष्ट्रवादी महिला जिल्हा कार्याध्यक्षा नाजेमा सय्यद मुजाहिद यांच्या पुढाकाराने मोफत रोग निदान शिबिर घेण्यात आले या शिबिरामध्ये गरोदर माता, स्तनदा माता त्यांची तपासणी करण्यात आली तसेच महिलांची आरोग्य तपासणी रक्त तपासणी बीपी, शुगर तपासणी व औषधोपचार करून मोफत औषध गोळ्या वाटप करण्यात आल्या या शिबिरात 200 दोनशे महिलांवर औषधोपचार व त्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली व तसेच आरोग्य केंद्राच्या परिसरात वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले



0 Comments