💥जाणून घ्या कोरफड सेवना संदर्भात ‘या’ महत्वाच्या गोष्टी ;-
तुम्ही आत्तापर्यंत कोरफडीच्या अनेक फायद्यांबद्दल ऐकलं असेल पण कोरफडीच्या अती सेवनाने देखील आपल्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो कोरफड ही आयुर्वेदिक वनस्पती आहे अनेक लोक अनेक वर्षांपासून त्याचा वापर शारीरिक स्वास्थ्य जपून ठेवण्यासाठी करत आले आहेत कोरफड ही आपल्याला फायद्याबरोबरच नुकसान देखील पोहोचवू शकते असं वेब एम.डी.च्या अहवालनुसार सांगण्यात आलं आहे.
कोरफड मध्ये असे काही लैक्सेटिव (रेचक) घटक आहेत जे शरीराला नुकसान पोहोचवू शकतात जेव्हा आपण कोरफडीचा ज्यूस किंवा गर यांचं सेवन करतो तेव्हा कोरफडीच्या आतील गरात अढळणारे लैक्सेटिव घटक शरीरात अनेक समस्या निर्माण करू शकतात.
💥चला तर मग जाणून घेऊयात कोरफडीच्या अती सेवनाने शरीराला कोणते वाईट परिणाम होतात💥
१). डीहायड्रेशनची समस्या तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोरफड ज्यूस किंवा गर घेत असाल तर ते तुमच्या शरीराला हानी पोहोचवू शकतात.
कारण कोरफडीच्या अति सेवनाने शरीरात डीहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते.
२). अशक्तपणा जाणवणे कोरफडीचा ज्यूस तुम्ही सतत सेवन केलात तर शरीरात पोटॅशियमचे प्रमाण वाढू शकते.
त्यामुळे हृदयाचे ठोके कमी जास्त होऊ शकतात व अशक्तपणा जाणवू शकतो.
त्यात तुम्हाला हृदयासंबंधित काही आजार असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्या घेतल्यानंतरच कोरफड ज्यूसचे सेवन करावे.
3). स्किन एलर्जी समस्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी काहीजण कोरफडच्या आतील गरांचा वापर करतात.
या गरांचा वापर करताना त्वचेवर पुरळ येणे,
खाज सुटणे आणि लालसरपणा येणे अशा समस्या जाणवत असतील तर त्वरित कोरफड गरांचा वापर करणे थांबवा.


0 Comments