💥जखमी तिन जनांपैकी एकास पाथरीतील शासकीय रुग्णालयात तर दोघांना परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे💥
परभणी (दि.२६ जुलै २०२१) - जिल्ह्यातील पाथरीतील माजलगाव ते परभणी या राष्ट्रीय महामार्गावर पाथरी शहरातील सेंट्रल नाका परिसरात आज सोमवार दि.२६ जुलै २०२१ रोजी सकाळी ०७-३० वाजेच्या सुमारास एका भरधाव वेगाने जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स ने धडक दिल्याने ३ जन गंभीर जखमी झाले.
त्यापैकी एका व्यक्तीस पाथरी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात तर दोघांस परभणी जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.बेजवाबदारपणे बस चालवून तिन जनांना गंभीर जख्मी केलेल्या खाजगी ट्रॅव्हल्सचा क्र.एम.एच.०९ जीव्ही २७९० असा आहे....

0 Comments