💥कराड हॉस्पिटल व मोरया हॉस्पिटलच्या वतीने आयोजन; जास्तत जास्त नागरीकांनी लाभ घेण्याचे केले आवाहन💥
परळी । प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या माजी ग्रामविकास तथा महिला व बालकल्याण मंत्री लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस विशेष उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. कराड हॉस्पिटल व मोरया हॉस्पिटलच्या वतीने नागरीकांसाठी उपयुक्त असलेल्या भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. गरोदर मातांची तपासणी, मोफत प्रसुतीसाठी नोंदणी तसेच दंतरोग व त्वचेच्या विविध आजारांची मोफत तपासणी केली जाणार आहे. शिबीराबाबत सविस्तर माहीती देवून परळी शहरातील व ग्रामिण भागातील नागरीकांनी याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ.शालीनीताई कराड यांच्यासह डॉ.शिरीष आघाव व डॉ.प्रियांका आघाव यांनी केले आहे.
लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दिनांक 26 जुलै 2021 रोजी परळी येथील कराड हॉस्पिटल व मोरया क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, सोमवार दि. 26 जुलै 2021 रोजी सकाळी 10 ते दुपारी 02 या वेळेत पार पडणाऱ्या या शिबिरामध्ये गरोदर महिलांची मोफत तपासणी तसेच मोफत प्रसूतीसाठी नाव नोंदणी करण्यात येणार आहे. याचबरोबर दंतरोग, त्वचेच्या विविध आजारावर उपचार व मार्गदर्शन करण्यात येणार असून गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.शालिनीताई कराड, डॉ.शिरीष आघाव व डॉ.प्रियांका आघाव यांनी केले आहे. नाव नोंदणीसाठी कराड हॉस्पिटल (9657655813) बस स्टँड समोर परळी वैजनाथ, मोरया क्लिनिक (9890068411) भगवान बाबा चौक जलालपूर रोड आणि वैजनाथ मेडिकल (8308471212) भगवान बाबा चौक या ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. शिबीरात येतांना लाभार्थ्यांनी आधार कार्ड, राशन कार्ड व तपासणीची जुनी फाईल सोबत घेऊन यावी असेही संयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे...

0 Comments