💥पुर्णेतील नालंदा नगर येथील सुभेदार रामजी आंबेडकर सभागृहात बुध्द आणि धम्म ग्रंथाचे वाचन....!


💥यावेळी पुज्य भदंन्त डॉ.उपगुप्त महाथेरो व भंन्ते पय्यावंश यांची प्रमुख उपस्थिती होती💥 

पुर्णा (दि.२७ जुलै २०२१) - शहरातील नालंदा नगर येथील सुभेदार रामजी आंबेडकर सभागृहात आज मंगळवार दि.२७ जुलै २०२१ बुध्द आणि धम्म ग्रंथाच्या वाचनास नालंदा जय भिम मंडळाचे अध्यक्ष पि.एम.बागुल यांच्या अध्यक्षते खाली करण्यात आली.

यावेळी पुज्य भदंन्त डॉ.उपगुप्त महाथेरो व भंन्ते पय्यावंश व नगरसेवक विरेश कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती बुध्द आणि धम्म ग्रंथाचे वाचन यशवंत लांबसोंगे हे करणार आहेत यावेळी लक्ष्मीकांत शिंदे,टि.एन.आडेकर,बि.आर.बोधक,मारोती खिल्लारे,उत्तम हातागळे,विश्वनाथ गवळी,भोजराज कसबे,प्रभाकर काशिदे,वैजनाथ मन्याळीकर,जनार्धन वाघमारे,तक्षशीला महिला मंडळ अध्यक्षा मिराबाई बोधक,सुलक्षणा धबाले,शोभा कांबळे,विमलबाई गवळी,कुसुम शिंदे यांच्यासह भारतीय बौध्द महासभेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत नगरसेवक विरेश कसबे यांनी केले..... 

Post a Comment

0 Comments