💥पुर्णा तालुक्यात पद आणी प्रतिष्ठेच्या आड चालतोय अवैध वाळू उत्खननासह वाळू तस्करीचा गोरख धंदा...!


💥पुर्णा-गोदावरी नदीपात्रांच्या गाव परिसरात तत्वभ्रष्ट राजकीय पक्ष पदाधिकाऱ्यांनी साठवले वाळू साठे💥

परभणी/पूर्णा (दि.०७ जुन) पावसाळा लागण्यापुर्वी प्रचंड प्रमाणात अवैध चोरट्या वाळूचे उत्खनन करून त्या चोरट्या वाळूची पावसाळ्याच्या चार महिण्याच्या कालावधीत तस्करी करून गडगंज पैसा कमावण्याच्या हव्यासापोटी पांढऱ्या शुभ्र खादीतील राजकीय पक्ष पदांचे मुखवटे घातलेल्या भ्रष्ट लबाड लांडग्यांच्या टोळ्या मागील अनेक महिण्यापासून तालुक्यातील पुर्णा-गोदावरी पात्रावर अक्षरशः तुटून पडल्याचे निदर्शनास येत असून आपल्या पद आणी प्रतिष्ठेच्या आड शासकीय गौण-खनिज वाळूची लुटमार करून शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या महसुलावर डल्ला मारतांना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन केलेल्या चोरट्या वाळूचे प्रचंड साठे नदीकाठावरील गाव परिसरात साठवण्यात आल्याचे निदर्शनास येत असतांना महसूल प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे पाहावयास मिळतआहे.

तालुक्यातील पुर्णा-गोदावरी नदीकाठच्या सुकी,पिंपळगाव,माटेगांव,कान्हेगाव,कानखेड १,कानखेड २,धनगर टाकळी परिसरातील शेत शिवारासह शासकीय गायरान जमीनींवर तालुक्यातील काही तत्वभ्रष्ट लोकप्रतिनिधींसह राजकीय पक्षांच्या पदाधीकारी तथा तथाकथित समाजसेवकांचे वाळु साठे जागोजाग पाहावयास मिळत असुन केवळ राजकीय दबावाखाली येथील महसुल विभाग संबंधित वाळू साठ्यावर कार्यवाही करण्यास हिंमत करीत नसल्याचे बोलले जात आहे.
        कोव्हीड-१९ महामारी घोषीत होताच सर्वत्र लाकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली. त्यातच विना परवाना बांधकाम, वाहतूक उद्योगधंद्ये बंद करण्याचे आदेश प्रशासनाने निर्गमीत केले.परंतु वाळू चोरीतुन लाखों रुपये कमावणाऱ्या पांढरपेश्या वाळु माफियांत तालुक्यातील काही प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधीकाऱ्यांनी लॉकडाऊनच्या काळात प्रचंड प्रमाणात वाळू उपसा करुन पुर्णा-गोदावरी नदीकाठच्या परिसरात लाखों रुपयांच्या वाळूची साठे नव्हे डोंगर उभे केले.चोरट्या वाळू तस्करीतून मिळणाऱ्या गडगंज पैश्यामुळे तोंडाला रक्त लागलेल्या या लालचखोर महाभागांनी स्थानिक प्रशासनात कुणाला हाताशी धरुन लक्ष्मीअस्त्राने तर कुणाला राजकिय दहशतीखाली दाबून ठेवले होते. त्यामुळे शासनाची कोणतीही परवानगी नसताना या वाळु माफीयांनी अवैध पद्धतीने वाळू गोळा केली.काही ठिकाणी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली.परंतु जप्त करण्यात आलेली वाळू पुन्हा त्याच वाळू माफीमांच्या घशात घातली.तालुक्यात आज शेकडो घरकुलांचे काम वाळू अभावी रखडले असतांना मात्र याच खादीतील बाळू माफियांच्या मार्फत चालत असलेल्या बोगस शासकीय विकास कामांना मात्र भरघोस वाळू साठा सहज उपलब्ध होतांना दिसत आहे.
        तालुक्यातील पुर्णा-गोदावरी नदीच्या पात्रात काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी दिवसरात्र मोठ्या प्रमाणात अवैधरित्या चोरट्या वाळूचा भरदिवसा उपसा करुन शासनाच्या लाखों रुपयांच्या  महसूलाला चुना लावतांना दिसत आहेत ‌असे असताना खरंच  त्यांच्या विरोधात केवळ राजकिय दबावाखाली स्थानिक अधिकारी कार्यवाही करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात असून या गंभीर प्रश्नाकडे आता दस्तुरखुद जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनाच लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या