💥परभणी जिल्ह्यातील गंगाखेड पाठोपाठ आता पूर्णा शहरातही कोरोना विषाणूंच्या प्रकोपाला सुरुवात...!


💥शहरात चिंतेचे वातावरण,परंतु प्रशासकीय निर्देशांचे पालन न करण्याचा मुर्खपणा मात्र कायम💥

परभणी (दि.२६ जुलै)- जिल्ह्यातील गंगाखेड शहरा पाठोपाठ आता पुर्णा शहर परिसरातही कोरोना विषाणूंच्या प्रकोपाला सुरुवात झाल्याचे दिसत असून पूर्णेत सुध्दा एकापाठोपाठ एक कोरोनाबाधित रुग्ण आढळू लागले असून त्यामुळे पूर्णेकरांमध्ये चिंतेचे वातावरण परसरले आहे.शहरातील महिला कर्मचारीसह पती व दोन मुले आज रविवार दि.२६ जुलै रोजी रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. शुक्रवारी व शनिवारी सुध्दा पुर्णेत कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले होते. 



दरम्यान, नांदेड व परभणी येथील शासकीय रुग्णालयात काही रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे पूर्णेत सुध्दा आता दहशतीचे वातावरण पसरल्याचे दिसत असले तरी शहरातील जिल्हा प्रशासनाने घोषित केलेल्या प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरीक सर्वत्र मुक्त संचार करतांना पाहावयास मिळत असून या प्रतिबंधीत क्षेत्रात अन्य क्षेत्रातील नागरिक ही मोठ्या प्रमाणात प्रवेश करीत असल्याने अवघ्या काही दिवसातच शहरासह संपूर्ण तालुका कोरोना विषाणूंच्या विळख्यात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे... 

Post a Comment

0 Comments