💥सचखंड रेल्वेच्या प्रवाशांनी स्थानकावरच वैद्यकीय तपासणी करावी - निवासी उपजिल्हाधिकारी💥असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती स्वाती सुर्यवंशी यांनी केले आहे💥

परभणी, दि.1 :- मुंबई येथून सचखंड रेल्वेने दि. 1 ते 10 जून 2020 पर्यंतच्या कालावधीत परभणी व पुर्णा रेल्वे स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांनी रेल्वे स्थानकावरच वैद्यकीय तपासणी करुन  प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती स्वाती सुर्यवंशी यांनी केले आहे.

          लॉकडाऊन कालावधीत मुंबई येथून सचखंड रेल्वेने दि. 1 ते 10 जून 2020 या कालावधीत प्रवाशी परभणी व पुर्णा रेल्वे स्थानकात उतरणार आहे. कोव्हीड -19 या आजाराचे अनुषंगाने या प्रवाशांची वैदयकीय पथकामार्फत वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक असल्याने आरोग्य यंत्रणेमार्फत प्रवाशांची रेल्वे स्थानकावरच वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व प्रवाशांनी आरोग्य तपासणी झाल्यानंतरच रेल्वे स्थानकातून बाहेर पडावे. असेही कळविण्यात आले आहे.
                      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या