💥गंगाखेड मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विशाल कदमच - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे



💥पालमच्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंची स्पष्टोक्ती जानकारांनी मैत्रीचे संबंध जपावे💥 

पूर्णा /शेतकऱ्यांची फसवणूक करीत त्यांच्या नावावर करोडो रुपये उचलुन भ्रष्टाचार करणा-या उमेदवाराला महायुतीच्या महादेव जानकर यांनी उमेदवारी दिली.महायुतीच्या माध्यमातून जानकरांशी मैत्रीचे संबंध निर्माण झाले असून त्यात कोणतीही खोटं निर्माण होऊ नये त्यांनी ते संबंध जपावे.गंगाखेड मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आलेला आहे.तेथे शिवसेना ही जागा लढवत आहे.महायुतीचे उमेदवार म्हणून विशाल कदमच निवडणूक लढवत आहेत. त्यांना प्रचंड मतांनी विजयी करुन विधानसभेत पाठवावे असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी केले.

         शिवसेना भाजपा  रिपाइं शिवसंग्राम रयतक्रांती सेना महायुतीचे उमेदवार विशाल कदम यांच्या प्रचारार्थ पालम येथील नारलेवार मैदानावर रविवारी १३ रोजी आयोजित प्रचंड जाहीर सभेत ते बोलत होते.प्रारंभी भाजप शिवसेना रिपाइं शिवसंग्राम रयतक्रांती सेनेच्या वतीने उद्धव ठाकरे यांचा भव्य सत्कार करण्यात आला.व्यासपिठावर खा.संजय उर्फ बंडू जाधव,बंजारा समाजाचे नेते मा.खा.हरिभाऊ राठोड,मा.आ.हरिभाऊ लहाने, महायुतीचे उमेदवार विशभाजपचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबासाहेब जामगे,विठ्ठल रबदडे,श्यामसुंदर मुंढे, व्यंकटराव तांदळे,पालमची मुलुख मैदानी तोफ गणेशराव रोकडे (दादा), बाजार समिती सभापती बालाजी देसाई, मा.नगराध्यक्ष रामप्रभु मुंढे,जि.प सदस्य डॉ.सुभाष कदम, सुधाकर खराटे,दशरथ भोसले, हनुमंतराव पौळ, काशिनाथ काळबांडे, अनिल सातपुते, भाजप चे लक्ष्मीकांत कदम, डॉ अजय ठाकूर,दत्ता घोरपडे, भागवत बाजगीर, अनिल खानापुरे, गजानन पवार, मुंजा कदम, जितेश गोरे,राजु भालेराव,बबन पवार,बाळा शिरसकर, श्रीकांत क-हाळे,माऊली दुधाटे गजानन शिरसकर शेख मुकरम, राम जाधव,आदींची उपस्थिती होती.पुढे बोलताना उद्धवजी म्हणाले की, या मतदारसंघात करोडो रुपयांचा भष्ट्राचार करणा-या  तुरुंगात सडणा-या ठगाला निवडून दिले तर तो पुन्हा आणखी भ्रष्टाचार करील त्यामुळे  अश्या भष्ट्राचारी उमेदवारांच्या पेकाटात लाथ मारुन हाकलून द्यावे.  अनेक वर्षापासून विकासा पासून वंचित राहीलेला हा गंगाखेड मतदारसंघ आजपर्यंत सर्वसामान्य जनतेला धनशक्तीवाल्यांनी पैशाची आमीष दाखवून निलडणुका जिंकल्या. मतदारसंघाला  मात्र भकास केले.शिवसेने परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकविम्यासाठी खा.बंडू जाधव रान उठवले, शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना सतत रस्त्यावर उतरली.सत्तेत राहुनही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सराकार विरोधात आवाज उठवला.देशाचे पंतप्रधान चांगले काम करत आहेत.त्यांनी देशहितासाठी ३७० कलम रद्द केला म्हणून पुन्हा युती केली तसं त्यांनी राममंदिर प्रकरणाचा निकाल लावावा शिवसेना साथ देईल.
         हजारोंच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायस मार्गदर्शन करताना त्यांनी राष्ट्रवादी व काँग्रेसवर टीका करण्यासारखं आता काही राहील नसल्याचे सांगितले. तर राहुल गांधी मैदान सोडून विदेशात गेले. बाळासाहेब थोरात असुद्या आम्हीही तितकेच ज जोरात असल्याचे  तर अजित पवारांनी भ्रष्टाचार करुन जनतेला लुटलं असल्याचा टोला लगावला. आगामी काळात पिकं विमा,तरुणांच्या हाताला काम कर्जमुक्ती अश्या अनेक योजनात मी लक्ष देणार असल्याचेही उद्धवजी ठाकरे म्हणाले...

यावेळी प्रस्तावीक करताना उमेदवार विशाल कदम म्हणाले की, विकासापासून कोसो दूर असलेल्या मतदारसंघात एका शेतकऱ्यांचा मुलगा निवडणूक रिंगणात उभा आहे. काहींनी आज पर्यंत धनशक्तींच्या जोरावर निवडणूका लढवल्या परंतु आता शेतकऱ्यांच्या सेवेसाठी मी निवडणूक लढवत आहे.येणारी पाच वर्ष मी जनतेचा सेवकच म्हणून काम करणार असल्याचे विशाल कदम यांनी सांगितले.
      यावेळी सुत्रसंचलन पद्दु महाराज यांनी केले तर आभार तालुका प्रमुख हनुमंतराव पौळ यांनी केले.यावेळे हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदाया मुळे पालम शहरात भगवेमय वातावरण निर्माण झाले होते.

Post a Comment

0 Comments