🌟महाराष्ट्र राज्यात वाल्मिकी समाजातील दोन युवकांची निर्घृण हत्या : वाल्मिकी आर्मीने केला जाहीर निषेध....!


🌟वाल्मिकी आर्मीने निवेदनाद्वारे केली आरोपींवर कठोर कारवाईची मागणी🌟

महाराष्ट्र राज्यात वाल्मिकी समाजातील दोन युवकांची अमानुषपणे निर्घृण हत्या केल्याच्या दोन घटना घडल्याचे उघडकीस आले असून यात बिड येथील यश ढाका व लासलगाव रेल्वे स्थानक येथील कुंदन चावरीया या दोन युवकांच्या हत्येचा समावेश आहे या दोन्ही घटनांचा आज मंगळवार दि.३० सप्टेंबर २०२५ रोजी वाल्मिकी आर्मीच्या वतीने पुर्णा पोलिस स्थानकांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवून जाहीर निषेध करण्यात आला आहे.


राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात वाल्मिकी आर्मीने असे नमूद केले आहे की वाल्मिकी समाजातील बिड येथील युवक यश ढाका यांची अमानुषपणे निर्घृण हत्या करण्यात आली तर याच घटनेप्रमाणे लासलगाव रेल्वेस्थानक येथील युवक कुंदन चावरिया यांना देखील समाजकंटकांनी अमानुषपणे मारहाण केल्याने झालेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला या दोन्हीही घटना मानवतेला काळीमा फासणाऱ्या असल्याने या दोन्ही घटनांतील जबाबदार असलेल्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा कशी होईल या दृष्टीने राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी योग्य ती पावल उचलावी असेही निवेदनात म्हटले असून निवेदनावर वाल्मिकी आर्मीचे संस्थापक अध्यक्ष ॲड.सुमित चावरे वाल्मीकि आर्मीचे परभणी जिल्हाध्यक्ष मनोज सौदा, अखिल भारतीय वाल्मिकी महासभा परभणी जिल्हाध्यक्ष विजय सौदा,लालसेना संघटनेचे मराठवाडा प्रवक्ते प्रकाश गायकवाड, अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्सचे परभणी जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड़, वाल्मिकी आर्मीचे  सुरेश पोहाल,रोहण सौदा आदींसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.....

Post a Comment

0 Comments