💥मालवणीत तुरुंगातून सुटलेल्या कैद्यांच्या स्वागतासाठी मिरवणूक ; पाच जणांना अटक....!


💥कबीर मुल्ला,अजमल कुरेशी,अफजल कुरेशी,मनोज व्यास,सादीक शेख अशी अटक आरोपींची नावे आहेत💥

मुंबई : तुरुंगातून सुटलेल्या कैद्यांच्या स्वागतासाठी दुचाकी रॅली काढल्याची घटना मालवणीत घडली. मात्र हा जल्लोष काही वेळाचाच ठरला. करोना नियमांचे उल्लंघन करून रॅली काढल्याने या आरोपींवर पोलिसांनी गुन्हे नोंदवून त्यांना पुन्हा अटक केली. मालवणी पोलिसांनी रॅली काढणाऱ्या ५ जणांना अटक केली. कबीर मुल्ला, अजमल कुरेशी, अफजल कुरेशी, मनोज व्यास, सादीक शेख अशी अटक आरोपींची नावे आहेत.

हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहा जणांवर ६ जुलैला मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्यांना अटक केली होती. शुक्रवारी हे सर्वजण तुरुंगातून सुटले. त्यांच्या जल्लोषासाठी त्यांनी ८ दुचाकींवरून रॅली काढली. त्यात २५ ते ३० जण सामील झाले होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या