🌟महाज्योती संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण...!


🌟कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यस्थानी समाज कल्याण सहाय्यक आयक्त श्रीमती गीता गुठ्ठे ह्या होत्या🌟

परभणी (दि. 08 डिसेंबर) : इतर मागासप्रवर्ग विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासप्रवर्गातील मुलांच्या शैक्षिणक किंवा आर्थिक सामाजिक विकासासाठी महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने (महाज्योती) जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यस्थानी समाज कल्याण सहाय्यक आयक्त श्रीमती गीता गुठ्ठे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणुन सहाय्यक लेखाधिकारी बी.एन.स्वामी यांची उपस्थिती होती. 

मान्यवरांच्या हस्ते एमएच-सीईटी/जेईई/एनईईटी-2025 चे परीक्षापुर्व प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना श्रीमती गुठ्ठे म्हणाल्या की, महाविद्यालयीन काळात विद्यार्थ्यांनी कसोशीने प्रयत्न केले तर प्रत्येकाचा भविष्यकाळ हा उज्वल  झाल्याशिवाय राहणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी टॅबद्वारे एमएच-सीईटी/जेईई/एनईईटी-2025 चे प्रशिक्षण ऑनलाईन घेऊन उज्वल यश मिळवावे. सर्व विद्यार्थ्यांनी सातत्यपुर्ण अभ्यास करुन स्पर्धा परीक्षेत व नीट परीक्षेत यश मिळवावे असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विज्ञान शाखेचे विद्यार्थी पालक व कर्मचारी यांची उपस्थिती होती. सुत्रसंचलन आर.बी.वजीर यांनी केले.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.......

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या