🌟समाजाला भूषण वाटावं अस आदर्श दा म्पत्य आदरणीय विमलताई व आदरणीय बाबासाहेब जाधव....!


🌟बुलढाणा जिल्हा रिपाई आठवले गटाचे ज्येष्ठ पदाधिकारी म्हणून त्यांचं कार्य सर्वश्रुत🌟


एस टी महामंडळ महाराष्ट्र का स्ट्राइब संघटनेचे राज्य उपाध्यक्ष  दैनिक सम्राटचे  बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी आदरणीय बाबासाहेब नागोराव जाधव व सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी   बुलडाणा विमलताई बाबासाहेब जाधव यांच्या लग्न परिणय दिनाचा आज वाढदिवस मेड फॉर इच अदर  अशा प्रकारची ही जोडी महामानव तथागत भगवान बुद्ध बोधी सत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे सर्वोच्च आदर्श त्यांचे विचार व कार्य आचरणात आणून  सामाजिक राजकीय शैक्षणिक धार्मिक पत्रकारिता क्षेत्रामध्ये बहुमोल अशा प्रकारचे योगदान दिले.दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातूनच सर्वांगीण प्रगती होऊ शकते. यावर ठाम विश्वास ठेऊन विमलताई बाबासाहेब जाधव यांनी एसएससी डीएड झाल्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षिकेची नोकरी स्वीकारून सेवा अंतर्गत  त्यांनी उच्च शिक्षण घेतले.

 एम ए एम येड पर्यंतचे शिक्षण ग्रामीण भागामध्ये  गोरगरीब शेतकरी कष्टकरी मुला मुलींना  शिक्षणाची आवड लावली. काळाच्या कसोटीला टिकेल  अशा प्रकारचे दर्जेदार शिक्षण दिले. विद्यार्थी प्रिय शिक्षिका शिस्तप्रिय मुख्याध्यापिका शिक्षण विभाग कार्यालय अधिकारी व शिक्षकांमध्ये समन्वय ठेवून कार्य करणाऱ्या केंद्रप्रमुख जिल्हा परिषद शिक्षण विभागाची आपल्या पारदर्शक कार्यशैलीने  विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या शिक्षण विस्तार अधिकारी या भूमिका त्यांनी समर्पित भावनेने पार पाडल्या एक आदर्श संस्कारक्षम शिक्षिका माता म्हणून त्यांचा आदर्श  शिक्षण विभागामध्ये काम करणाऱ्या अधिकारी व शिक्षक वृंदानी घेतला पाहिजे.

 "कुटुंब लहान सुख महान" 

एक मूल गुलाब का फुल" हा ऐकायला सुखद परंतु कृती करण्यासाठी अतिशय अवघड असा विचार विमल ताई  व बाबासाहेब जाधव यांनी आचरणात आणला.पुत्ररत्न प्राप्त झाल्यानंतर आपल्या या लाडक्या सुपुत्राच नाव विचारपूर्वक  योगेश ठेवले.त्याच्यावर चारित्र्य नीतिमत्ता सदाचारांचे संस्कार बिंबवले त्यांचे हे सुपुत्र  डॉक्टर योगेश  यांनी वैद्यकीय क्षेत्रामधल सर्वोच्च शिक्षण  एमबीबीएस एमडी प्राविण्‍यामध्ये उत्तीर्ण केले डॉक्टर योगेश  व त्यांच्या सहचारिणी डॉक्टर श्रवंती  अमेरिकेमधील प्रथित यश दवाखान्यामध्ये उच्च पदावर सेवा देत आहेत.

 आपले पूज्य आई वडील यांची सेवा करण्यामध्ये ते कुठेही कमी पडताना दिसत नाहीत सामाजिक बांधिलकी मधून गरीब गरजू बांधवांना ते मदत करत असतात अमेरिकेमध्ये जरी ते राहत असले तरी त्यांनी  आई-वडिलांसाठी संभाजीनगर या ठिकाणी अतिशय भव्य आणि दिव्य फ्लॅट घेऊन दिला विमल ताई व बाबासाहेब जाधव यांनी  सामाजिक कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतले आहे अनेक ठिकाणी त्यांनी बुद्ध विहारांना मोठ्या प्रमाणावर दान दिले आहे आंबेडकरी चळवळीच मुखपत्र  दैनिक वृत्तरत्न सम्राट या वर्तमानपत्राला  सढ ळ हाताने ते जाहिराती देत असतात.

 दैनिक वृत्त रत्न चे संपादक स्मृतीशेष आदरणीय बबन कांबळे साहेब यांचे विश्वासू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये  घरोघरी वृत्तरत्न सम्राट  पोहोचवण्याचं काम जिल्हा प्रतिनिधी या नात्याने  बाबासाहेब जाधव करत असतात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री  नामदार रामदास आठवले  यांच्याशी बाबासाहेब जाधव यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

 बुलढाणा जिल्हा रिपाई आठवले गटाचे ज्येष्ठ पदाधिकारी म्हणून त्यांचं कार्य सर्वश्रुत आहे अशा या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आदर्श दाम्पत्याचा लग्न परिणय वाढदिवसाचा दिव माझे ते प्रिय मामा मामी आहेत माझ्यावर आंबेडकरी व धम्मविचाराचे संस्कार टाकण्याचं काम त्यांनी केलेल आहे या मंगल प्रसंगी उभयतांना आयो आरोग्य बल वैभव धनसंपदा प्राप्त हो ही मनोकामना पौर्णिमेच्या शीतल चंद्रमाप्रमाणे उभयतांचं आयुष्य प्रकाशमान होवो ही सदिच्छा....!

 शुभेच्छुक 

 श्रीकांत हिवाळे सर 

मा.तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पूर्णा जिल्हा परभणी.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या