☀️रगडीता वाळूचे कणही तेल गळे......!


☀️धाडसी कामठे बंधूनी मजबूतपणे टाकलेल्या धाडसी व्यावसायिक पाऊल तरुण पिढीला निश्चितच मार्गदर्शक ठरेल☀️

💥व्यक्ती आणि व्यक्तीमत्व : लेखक - सतिष सातोनकर

आर एस कामठे इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुप आंतरराष्ट्रीय दर्जाचे राष्ट्रीय महामार्ग नवनिर्मिती मध्ये कसोटीला सच्चे उतरलेले नाव आज परिचयाचे मोहताज नाही.

व्यक्ती विशेष लिहीत असताना आपल्या कर्म साधने मधून जीवनाला कर्म सिद्ध करणारे व्यक्तिमत्व व त्यांच्या चौफेर यशस्वी कार्यकीर्ती साठी आपने लेखनी शब्द अंकित करत असताना तो लेखकाचा लेखणीचा खऱ्या अर्थाने सन्मान असतो.


गाव: खळद तालुका: पुरंदर जिल्हा पुणे सामान्य शेतकरी कुटुंबातील दोन भावांना आपल्या  कष्टाच्या परीकष्टातून उघड्या डोळ्यांनी आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न पडते.

शेतकरी कुटुंबातील दोन सख्खे भाऊ उघड्या डोळ्यांनी डोळसपणे  पाहिलेल्या स्वप्नांची स्वप्नपूर्तीसाठी शेतकरी मराठी संस्कृतीला उद्योगशीलतेच्या दिशेने घेऊन जात अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वर्गीय श्री रवि भाऊ व त्यांचे धाकटे बंधू नंदकुमार जी कामठे व्यवसायातील शून्यातून विश्व निर्मितीचा प्रयोग सुरू करतात "प्राचीन काळी माता गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी भगीरथाने काय प्रयत्न केले होते.आणि त्यांनी  गंगा मातेला पृथ्वीवर आणले तेव्हापासून एक म्हण तयार झाली आणि आपण त्यास "भगिरथ प्रयत्न "असे म्हणतो.


यश खरच एवढं सोपं असतं का हो " जावे तया वंशा तेव्हा कळे" जया अंगी मोठेपण तया यातना कठीण" या संत वचना मध्ये खूप अर्थ सामावलेला.अकल्पनीय अद्भुत अविश्वसनीय कार्यपूर्ती पूर्ण करणाऱ्या कुटुंबाचा परिचय व्यावसायिक क्षेत्रामध्ये  आज भारतभर आहे.

 परंतु मराठी माणूस व्यवसायात उतरण्यासाठी मनामध्ये एक  न्यूनगंड बाळगतो व भीतीपोटी तो व्यवसायाकडे न वळता नोकरीपेशाकडे वळतो व्यवसाय करणे म्हणजे असुरक्षित जीवन जगणे अशी मराठी मानसिकता मागच्या सत्तर वर्षांमध्ये तयार करण्यात आली आहे आपण सर्व गरवारे, किर्लोस्कर, कल्याणी, अलिकडे अगदी चितळे यांनी उभ्या केलेल्या अद्भुत वैश्विक दर्जाच्या उद्योग जगताचा परिचय सर्वसामान्य मराठी माणसापर्यंत पोचून दिला नाही.आणि मग नव्या पिढीसमोर आदर्श नसेल तर नवा आदर्श निर्माण होण्याची शक्यता फारच धूसर होते.


म्हणून आर एस कामठे इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुप महामार्ग विकसित करणे बांधकाम करणे या क्षेत्रामध्ये स्वतःचा एक आगळावेगळा अमीट मजबूत परिचय आपल्या कार्यातून दिला आहे.स्वर्गीय रवींद्र भाऊ व धाकटे बंधू नंदकुमार जी कामठे यांनी सुरू केलेलं कर्म यज्ञ आज इच्छापूर्ती च्या मार्गावर आहे.

  या दोघा भावांनी मजबूतपणे टाकलेल्या धाडसी व्यावसायिक पावलाचे,पाऊलवाटेचे रूपांतर आज महामार्गाच्या स्वरूपात परावर्तित झाली आहे.यासाठी त्यांना बऱ्याचदा पाऊल वाटेमध्ये काटेही टोचले  असतील, ठेचही लागली असेल,  निश्चित ध्येय प्राप्तीसाठी ज्यांनी उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहिले होते. त्या स्वप्न पूर्ततेसाठी त्यांनी काय  मान-अपमान ,कष्टाची पराकाष्टा करत असताना काय प्रसंग सुखदुःख झेलले असतील हे त्यांच्या कुटुंबीयांना व त्यांच्या आत्म्याला ठाऊक...


यशाचे कीर्तिशिखर गाठत असताना अपयशाची डोंगरमाला पार करावी लागते.म्हणूनच आपल्याकडे एक म्हण आहे "हे काम नव्हे  येऱ्या गबाळ्याचे.......

कामठे परिवाराचे दुसरे वैशिष्ट्य असे की या परिवाराने एकत्रित कुटुंब पद्धती जिवंत ठेवली आहे अगदी समृद्ध ठेवली आहे कुटुंब प्रमुख म्हणून घरातील थोरामोठ्यांचा विचार त्यांचा यथोचित मानसन्मान आणि स्वाभिमानी ग्रामीण मराठी बाणा हा या परिवाराचा आत्मा आहे.

 कुटुंबातील  अत्यंत कर्तृत्ववान पुरुष रविभाऊ कामठे साहेब यांच्या अकाली मृत्यूने या परिवारावर प्रचंड मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. आपले वडील बंधू अचानक जात राहिल्यामुळे छोटे बंधू नंदकुमार जी कामठे साहेबांनी कुटुंब व स्वतःला त्या दुःखातून सावरत आपले दोन्ही पुतणे महेश शेठ व सुधीर शेठ कामठे या दोन्ही ऊर्जावान सुसंस्कृत शिस्तबद्ध तरुणाईला बरोबर घेत महामार्ग निर्मितीच्या व बांधकामाच्या व्यवसायामध्ये नवे क्षितीज ,नवे स्वप्न नवी दिशा  निश्चित करत इन्फ्रास्ट्रक्चर व बांधकाम व्यवसाय यामध्ये जेवढी संधी आहे त्यापेक्षा जास्त धोका आहे. फायदा बरोबरच नुकसान ही उचलण्याची मानसिक तयारी या कुटुंबाचे बलस्थान आहे हाती घेतलेले काम पूर्ण करत असताना नफा तोटा न पाहता कार्यपूर्ती चा आनंद साजरा करायचा त्यामुळे आज महाराष्ट्रात आर एस कामठे इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी ओळखल्या जाते ती व्यवसायातील धोके स्वीकारण्याचे धाडसी स्वभाव रचना, संयमशील स्वभाव , तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ, समृद्धी मार्ग व एमएसआरडीसीच्या कित्येक अपूर्ण योजना यांनी पूर्ण करून दाखवल्या मागच्या पाच वर्षापासून रखडलेले परभणी जिंतूर हे महामार्गाचे काँक्रिटीकरणयाचे काम प्रचंड तोटा सहन करून आज बहुतांशी  पूर्ण केली आहे.

परभणी जिल्ह्यातील सर्वच महामार्गाची काम बंद पडलेली असताना परभणी जिंतूर हा 47 किलोमीटर रस्ता आज पूर्ण झालेला आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण करून घेऊन ते जिवंत ठेवण्यासाठी चा त्यांचा प्रयत्न पाहिला की मनाला आनंद वाटतो.

निसर्ग जगला तर आपण जगू ही भूमिका या वारकरी संप्रदायाच्या कामठे परिवाराची पाहून मन थक्क होऊन जाते.दरवर्षी घराजवळून जाणाऱ्या मराठवाड्यातील वारकरी संप्रदायाला दोन घास गोड खाऊ घालण्याची  वारकऱ्यांची सेवा करण्याची सेवावृत्ती या कुटुंबाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते.

कामठे परिवाराकडून शिकण्यासारखे आणखी एक अनुकरणीय गुण म्हणजे. साधी राहणी आणि उच्च विचार. आहार आणि विहार अक्षरशः वारकऱ्यांच्याच परंपरेतला.तरुण मित्रांनो आज तुम्ही बिझनेस मॅनेजमेंट हा विषय पूर्ण करत असताना आपल्याच सभोवताल आपल्याच मराठी शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेले कामठे कुटुंबीय व त्यांच्यातील युवा उर्जा विशेषता महेश शेठ रविभाऊ कामठे,  सुधीर सेठ रविभाऊ कामठे, तसेच यश नंदकुमार जी कामठे यांच्याकडे असलेली समयसूचकता, विद्युत गतीने निर्णय घेण्याची क्षमता, यशाच्या शिखरावर असतानाही तरुणांनी किती संयमाने किती नम्रतेने वागावे हा अनुकरणीय गुण आपल्याला या कुटुंबातील  तरुण यशस्वी उद्योजकांकडून घेतायेऊ शकतो.

 एका भागामध्ये औद्योगिक विकासाची विकास गंगा प्रत्यक्षात यशस्वीरित्या  अवतरीत करणाऱ्या आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेले स्वप्न आपली दुसरी पिढी ही त्याच भगीरथ प्रयत्नाने परिपूर्ण करत आहे असे फार कमी कुटुंबात घडते.

आजही हे कुटुंबीय आपल्या शेतामध्ये राहते आपल्या गावातच राहते यापेक्षा या कुटुंबाचा साधेपणाचा आणखी दुसरा कोणता दाखला द्यावा.होय "मेरा गाव मेरा देश "प्रत्यक्ष कामठे परिवाराने आपल्या कृतीतून हे सिद्ध केले आहे.

पुण्या-मुंबईतील  तसेच उर्वरित मराठी जनमानसाने या कुटुंबाकडून घेण्यासारखे खूप काय आहे त्यातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे एकत्रित कुटुंब पद्धती....

 मित्रांनो मी वर म्हटलेच आहे हे काम नव्हे  येऱ्यागबाळ्याचे इथे पाहिजे जातीचे मी कामठे परिवाराबद्दल असे का लिहिले   शिवकालीन स्वराज्यनिर्मीतीच्या महान कार्यामध्ये कामठे या नावाचा बलीदानी इतिहास काय आहे!

 पुढच्या भागांमध्ये

 यावर प्रकाश टाकूया तूर्तास इथेच थांबू . भाग पहिला( पार्ट फर्स्ट) अपूर्ण... राजकीय व सामाजिक विश्लेषक तथा लेखक: एस.एस. सतीश नानलपेठ. परभणी. मराठवाडा.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. अत्यंत प्रेरणादायी,प्रभावी व वास्तव
    मांडणी.तरुणाईसाठी बोधप्रद , अनुकरणीय.
    "स्वरुपं सुंदरम् यस्य परिणाम शिवप्रद:।
    आशयं सत्यरूपस्य तत्साहित्यं विदुर्बुध:।।
    दिलीप कस्तुरे.
    कदंबनगरी ६/८/२०२२

    उत्तर द्याहटवा