🌟परभणी लोकसभा मतदारसंघात धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांचा आता जातीपातीच्या राजकारणाकडे कल ?


🌟आता 'जगात जर्मनी अन् भारतात विकासापासून कायम वंचित ठेवलेला एकमेव जिल्हा परभणी' असे म्हणा🌟

परभणी (विशेष वृत्त) - परभणी जिल्ह्यातील भोळ्याभाबड्या मतदारांना भुलविण्यासाठी राजकीय लबाडांकडून 'जगात जर्मनी अन् भारतात परभणी' या वाक्य रचनेचा सातत्याने प्रयोग केला जात असला तरी सर्वार्थाने अविकसित राहिलेल्या या परभणी जिल्ह्याची एकंदर परिस्थिती बघितल्यास असे निदर्शनास येते की आता या वाक्य रचनेत थोडासा बदल निश्चितच करून 'जगात जर्मनी अन् भारतात विकासापासून कायम वंचित राहिलेला एकमेव जिल्हा परभणी' अश्या वाक्य रचनेचा प्रयोग करण्या इतपत दयनीय परिस्थिती आता संपूर्ण परभणी जिल्ह्यात निर्माण झाली असून कृषी क्षेत्र,उद्योग क्षेत्र,व्यापार क्षेत्र,शैक्षणिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात पिछाडीवर असलेल्या या जिल्ह्याने राजकीय वरदहस्त प्राप्त गुन्हेगारी,अनैतिक व्यवसाय ज्यात गौण खनिज वाळू/दगड खडी/मुरूम/माती,शासकीय स्वस्त धान्य तस्करी, अवैध प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ गुटखा/गांजा नशिल्या पदार्थांची विक्री सह तस्करी,हायफाय जुगार अड्डे,शासकीय/निमशासकीय/खाजगी जमीन संपत्तींवर कब्जे,अवैध देशी/विदेशी बनावट दारू विक्री तस्करी,गो-गोवंश अवैधरित्या कत्तलीसह तस्करी आदींमध्ये मात्र आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

परभणी जिल्ह्यात लोकसभा निवडणूक असो की विधानसभा निवडणुक प्रत्येक निवडणुकीत सर्वसामान्य मतदार जनतेला भावनिक केले की मतदार विकासाच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे अगदी डोळेझाक करून आपणास भावनेच्या भरात मतदान करतो असा पक्का भ्रम नव्हे तर आत्मविश्वासच प्रस्थापित लबाड राजकारण्यांना झाला आहे असे म्हणणे यत्किंचितही चुकीचे ठरणार नाही मागील जवळपास तीन/साडेतीन दशकांपासून शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्ववादी विचारांनी भारावलेला या परभणी जिल्ह्यातील सर्वसामान्य मतदार कायम शिवसेना-भाजप युतीच्या मागे खंबीरपणे उभा राहिला परंतु सन २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत सोबत निवडणूक लढवलेल्या भाजप-शिवसेना युतीत सुरुवातीलाच उभी फुट पडल्यानंतर शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाशी हातमिळवणी करून स्वतःची मुख्यमंत्री पदावर तर त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांची मंत्री पदावर वर्णी लावून घेतली त्यामुळे पक्षात धुसफूस सुरू झाली व अडीच वर्षातच शिवसेना पक्षात मोठी फुट पडून प्रखर हिंदुत्वाचा वसा घेतलेल्या शिवसेना (शिंदे) गटाचे नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीशी युती करून सत्तेची सूत्रे आपल्या हाती घेतल्याने याचा दुरगामी परिणाम स्व.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी भारावलेल्या व शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परभणी लोकसभा मतदारसंघावर झाला म्हणतात ना सत्तेपुढे शहाणपण चालत नाही एकंदर अशीच अवस्था या मतदारसंघाची झाली परभणी जिल्ह्यातून वेगळा झालेल्या हिंगोली जिल्ह्याचा विकास झपाट्याने होत असतांना परभणी जिल्हा मात्र विकासापासून कायम का वंचित राहिला ? याचा विचार या मतदार संघातील सुजाण मतादरांनी कधीही केला नाही कारण त्याउलट हिंगोली/नांदेड/जालना या जिल्ह्यातील सुजाण मतदारांनी प्रत्येक लोकसभा/विधानसभा निवडणुकीत मतपेटीच्या माध्यमातून बदल घडवून जिल्ह्याच्या विकास घडवून आणला परंतु परभणी लोकसभा मतदारसंघात मात्र तसे झाले नाही त्यामुळे हा जिल्हा कायमस्वरूपी विकासापासून वंचितच राहिला.

परभणी लोकसभा मतदारसंघातील निवडणूकीच्या मैदानात एकूण ३४ उमेदवार निवडणूक मैदानात उतरले असून यात शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संयुक्त महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव,सत्ताधारी शिवसेना (शिंदे),राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी,रिपाइं (आठवले),राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या संयुक्त महायुतीकडून महादेव जानकर,वंचित बहुजन आघाडीकडून प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख पाटील,मराठा बहुजन आघाडीकडून सुभाषराव जावळे पाटील,अपक्ष समीर गणेशराव दुधगावकर तर बहुजन समाज पार्टीकडून आलमगीर खान आदी प्रमुख उमेदवारांचा समावेश असून वंचित बहुजन आघाडीने या लोकसभा निवडणुकीत मराठा उमेदवार दिल्यामुळे मागील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून उभे राहिलेल्या व भरघोस मत घेतलेल्या आलमगीर खान यांनी या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीकडून उमेदवारी दाखल केल्याने या निवडणुकीत एकमेव तुल्यबळ मुस्लिम उमेदवार म्हणून आलमगीर खान यांच्याकडे बघीतले जात आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघ हा कायम शिवसेना-भाजप युतीचा बालेकिल्ला राहण्याचे एकमेव कारण म्हणजे येथील मतदार अत्यंत इमानदार तत्वनिष्ठ व शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्ववादी विचारांनी प्रेरित झालेला मतदार आहे परंतु यावेळी मात्र शिवसेना दुभंगून दुभंगलेल्या शिवसेना (उबाठा) गटाचे नेतृत्व करणाऱ्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुखांच्या ज्वलंत हिंदुत्ववादी विचारांशी काडीमोड करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षांशी युती करून महाविकास आघाडी केल्यामुळे यावेळेस शिवसेनेचा हा अभेद्य बालेकिल्ला ढासळण्याची शक्यता वर्तवली जात आहे याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे मागील तीन/साडेतीन दशकांपासून धर्माच्या नावावर मतदान मागणाऱ्या व 'खान हवा की बाण' म्हणणाऱ्यांना या निवडणुकीत निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण तर गमवावा लागलाच त्याउलट पक्षतत्वांशी काडीमोड करुन धर्मनिरपेक्ष राजकारणाचा अंगिकार करुन मतदानासाठी अक्षरशः खाना समोर देखील नतमस्तक होण्याची वेळ आली हा निय्यतीचाच खेळ म्हणावा लागेल तर महाविकास आघाडी (इंडिया आघाडी)ने महाराष्ट्र राज्यातील ४६ लोकसभा मतदारसंघा पैकी एकाही लोकसभा मतदारसंघात अल्पसंख्याक मुस्लिम उमेदवाराला संधी न दिल्यामुळे यावेळेस अल्पसंख्याक मुस्लिमांमध्ये महाविकास आघडी (इंडिया आघाडी) विरोधात नाराजीचा सुर निघत असून याचा देखील परिणाम मतपेटीतून दिसून येणार असल्याचे बोलले जात आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघात बहुजन समाज पार्टीकडून एकमेव तुल्यबळ मुस्लिम उमेदवार म्हणून निवडणूक मैदानात उतरलेले आलमगीर खान यांची प्रत्येक समाजात चांगली प्रतिमा असल्यामुळे धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली अल्पसंख्याक मुस्लिम मागासवर्गीयांच्या मतदानावर दारोमदार असलेल्या इंडिया आघाडी अर्थात महाविकास आघाडीला यावेळी चांगलाच फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात असून परभणी लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजपचे ना कमळ....ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घडी....ना शिवसेनेचा धनुष्य बाण....आता फक्त एकच बहुजन समाज पार्टीचा डोईजड हत्ती निशाणी घेऊन उभा असलेला आलमगीर खान...असे अल्पसंख्याक मुस्लिम मागासवर्गीयांमध्ये बोलले जात आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून निवडणूक मैदानात उतरलेले उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर हे राजकीय वर्तुळात अत्यंत बुद्धिमान व सुशिक्षित सर्वसमावेशक सहिष्णू बहुजन नेतृत्व म्हणून ओळखले जातात त्यांना सुजाण मतदात्यांच्या नजरेत पाडण्यासाठी विरोधकांकडे कुठलाही मुद्दा नसल्यामुळे विरोधकांकडून त्यांच्या विरोधात जातीयद्वेष तर फैलावण्याचे दुष्कृत्य तर होतच आहे याशिवाय ते बाहेरील सातारा जिल्ह्यातील असल्याचे मतदारांना सांगितले जात असले तरी त्यांच्या कर्तृत्वक्षमतेवर सर्वसामान्य मतदानातून विश्वास व्यक्त होत असून ते परभणी जिल्ह्याचा विकास निश्चितच घडवून आणू शकतात असे देखील मतदारांतून बोलले जात आहे दरम्यान परभणी लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक मैदानात उतरलेले उमेदवार हवामान तज्ञ पंजाबराव डख पाटिल यांनी व्यक्त केलेल्या हवामानाच्या अंदाजावर असंख्य शेतकऱ्यांना वेळोवेळी फायदा होत असल्यामुळे शेतकरी मित्र म्हणून ते ओळखले जातात हवामानाचा अंदाज अचूकपणे सांगणारे हवामान तज्ञ तथा परभणी जिल्ह्याचे भुमिपुत्र पंजाबराव डख परभणी लोकसभा मतदारसंघातील राजकीय हवामानाचा अंदाज बदलू शकतील की नाही हे तर येणारा काळच सांगेल.

परभणी लोकसभा मतदारसंघात राज्याचे माजी मंत्री तथा माजी खासदार ॲड.गणेशराव दुधगावकर यांचे सुपुत्र समीर गणेशराव दुधगावकर हे देखील अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक मैदानात उतरले असून समीर दुधगावकर हे उच्चशिक्षित असून ते देखील परभणी जिल्ह्याचे भुमिपुत्र असल्याने तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात त्यांच्या नात्यागोत्यांचं जाळं मोठ्या प्रमाणात पसरलेल असल्यामुळे त्यांच्याकडे देखील तुल्यबळ प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून बघितले जात आहे तर परभणी लोकसभा मतदारसंघात मराठा बहुजन आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून सुभाषराव जावळे पाटील हे देखील निवडणूक मैदानात उतरले असून सामाजिक चळवळीतील धाडसी कार्यकर्ते म्हणून त्यांनी स्वकर्तृत्वाने आपली ओळख निर्माण केलेली असून जनसामान्यांसह ग्रामीण भागातील समाजबांधवांमध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने त्यांच्याकडे देखील एक तुल्यबळ उमेदवार म्हणून बघितले जात आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या