💥पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील भारतीय स्टेट बँक ग्राहक सेवा केंद्र बनली ग्राहकांसाठी आर्थिक पिळवणूक केंद्र...!


💥भारतीय स्टेट बँक अधिकारी व ग्राहक सेवा केंद्र चालकांचे संगणमत तर नाही ना ? 💥

परभणी (दि.२८ जानेवारी) - जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातली मोठी बाजारपेठ असलेले ताडकळस हे शहर पस्तीस ते छत्तीस खेड्यासी निगडीत आहे या ताडकळस शहरात आजू बाजूच्या परिसरातून विद्यार्थी युवक वयोवृद्ध बँकेच्या विविध कामासाठी  येत असतात. परंतु बँक खाते उघडणे प्रत्यक व्यक्तीसाठी महत्वाचा बनला आहे जसे शासकीय योजनाचा लाभ घेण्यासाठी किंवा पैसे टाकणे काढणे या साठी त्यात बँकेत नवीन खाते उघडण्यासाठी गेल्यास बँकेतील कर्मचारी अथवा अधिकारी ग्राहक सेवा केंद्रावर जा आमच्याकडे खाते उघडल्या जात नाही अस सांगत असतात. 

या मुळे बँकेच्या ग्राहकाला ग्राहक सेवा केंद्राशिवाय पर्याय उरत नाहीं आणि त्यात कोरोना साथीच्या रोगामुळे, कोरोना रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी व बँकेतील गर्दी कमी करण्यासाठी  ग्राहकांनी बँक ग्राहक सेवा केंद्राचा वापर करावा, असे निर्देश बँकेने दिले आहेत मात्र ताडकळस येथील ग्राहक सेवा केंद्र चालक याचाच फायदा घेऊन ग्राहकांची आर्थिक लुट करत आहेत. नवीन खाते उघडण्यासाठी ग्राहकांकडून महाराष्ट्र ग्रामीण बँक चे ग्राहक सेवा केंद्र चालक  शंभर  तर  भारतीय स्टेट बँक ग्राहक सेवा केंद्र चालक दोनशे  रुपये इतका चार्ज घेत आहेत. तर पैसे भरण्यासाठी अथवा काढण्यासाठी, एक हजार रुपयासाठी दहा रुपये इतका दर आकारल्या जात आहे. या कडे ताडकळस येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या  आणि भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकांची लुट थाबवण्यासाठी  दोन्ही बँकेतील व्यवस्थापक  या लुटारू ग्राहक सेवा केंद्र चालकांचे परवाने रद्द करून  कार्यवाही करतात का यांना पाठीसी घालून बँकेच्या ग्राहकाची लुट सुरु ठेवतात हेच पाहण महत्वाच असणारं आहे त्यामुळे भारतीय स्टेट बँक अधिकारी व ग्राहक सेवा केंद्र चालकांचे संगणमत तर नाही ना ? असा प्रश्न ग्राहक वर्गात उपस्थित होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. सदरील बातमी चुकीची आहे.
    सदरील इसम हा अशाच प्रकारे कार्य करत असतात.अगोदर यांनी पैशाची मागणी केली होती. नाही दिले तर अशा प्रकारच्या तक्रार दाखल करत आहेत.

    उत्तर द्याहटवा