💥'जनसेवक म्हणून निवडून दिलेला जनतेचा अधिकृत सेवक पहाता पहाता जनतेचा मालक बनून'......!


💥पत्रकार मित्रांनो सावधान ; ...तर कळतनकळत आम्ही सुध्दा लोकशाहीचे मारेकरीच ठरणार आहोत...?💥 

✍🏻शोध आणि बोध - लेखक ; चौधरी दिनेश (रणजीत)

लोकशाहीच्या मार्गावर मार्गक्रमण करीत लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारीतेला अगदी स्वाभिमानाने खंबीरपणे टिकवून ठेवायचे असेल तर तुमची पत्रकारीता सर्वसमावेशक असली पाहिजे भावनेच्या आहारी जाऊन जाती-धर्मावर किंवा एकाच पक्षाच्या विचारांनी प्रेरीत पत्रकारीता अंगीकारून जर त्याच त्याच लोकांना प्रत्येक वेळी शब्दरूपी सन्मानाचे गालिचे अंथरण्याची घोडचुक आम्ही करीत गेलो तर त्या लोकांना आम्ही दिलेल्या सन्मानाची किंमत यत्किंचितही कळणार तर नाहीच परंतु नकळत त्यांच्यातील अहंकारात सातत्याने भर पडतच राहणार राजकीय क्षेत्रात प्रत्येक राजकीय पुढारी अत्यंत चांगला किंवा अत्यंत वाईटही नसतो परंतु ज्याला आपण चांगले म्हणून समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी आपली लेखणी झिजवतो अहों शेवटी त्याच्या अहंकारी प्रवृत्तीला आम्हीच तर बळी पडत असतो.


ज्यांच्या लेखणीतील निघालेल्या प्रत्येक शब्दातून यांचे राजकीय भविष्य हळुवारपणे उदयास येत असते तिच लोक कालांतराने स्वतःच्या स्वर्थापोटी आम्हा पत्रकारांच्या लेखणीला स्वतःच्या दावणीला बांधण्याचा केविलवाना हलकट प्रयत्न करीत असतात अन् शेवटी प्रयत्न निष्फळ ठरल्या नंतर मात्र त्या लेखणीधारी हातासह लेखणीला स्वतःच्या पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करीत असतात त्यांच्या समर्थनाथ लिहिल्यानंतर साधे आभारही व्यक्त करण्याची अक्कल नसलेले बिनडोक राजकारणी मात्र विरोधात लिहिलेले लिखाण किती जरी सत्य असले तरीही प्रसंगी आपल्या तस्कर गुंड मवाली समाजकंठक साथीदारांना हाताशी धरून या लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाला मुळासकट उपटून फेकण्याचा कुटील डाव रचत असतात लोकशाही मार्गाचा अवंलंब करून जनमताच्या जोरावर निवडून आलेले राजकारणी शेवटी स्वतःच्या पापांचा भरलेला घडा पचवण्यासाठी मात्र शेवटी लोकशाहीचाच घात करतात वाटेल त्या मार्गाचा अवलंब करून कोट्ट्यावधीची संपत्ती गोळा करायची हा एकमेव मुळ उद्देश या उद्देशाच्या आड कोणी येता कामा नये अन आलातर मात्र त्याची खैर नाही शेवटी राजकारण आणि राजकारणी समाजासह देशाच्याही मुळावर उठतांना पाहावयास मिळत आहेत 'जनसेवक म्हणून निवडून दिलेला जनतेचा अधिकृत सेवक पहाता पहाता जनतेचा मालक बनून' हुकुमशाहीचे ढोलक वाजवतांना दिसल्यास यात नवलाई कसली ? सर्वकाही ठराविकच असते 'निवडून येण्यापुर्वी सेवक म्हणून पाय धरायचे आणि निवडून आल्यानंतर मात्र उपकाराची परतफेड म्हणून पाततयाखाली तुडवायचे' कोट्यावधीचा शासकीय विकासनिधी कागदोपत्री कश्या पध्दतीने गिळकृत करता येईल,शासकीय निमशासकीय भुखंडासह सर्वसामान्य जनता कार्यकर्त्यांच्या जमिनी अगदी सहज कश्या हडपता येतील या एकमेव उद्देशाने झपाटलेल्या पुढाऱ्यांना आपल्या लेखणी झिजवून अगदी गल्लीतून टुक्कारपणाचे धडे गिरवता गिरवता दिल्लीपर्यंत पोहोचविण्याचे पाप शेवटी आम्हीच तर करीत असतो ना ?


समर्थनाथ कितीही चांगल्या पध्दतीने लिखाण केल्यानंतर त्या लिखाणाचे यत्किंचितही महत्व समजण्याची अक्कल नसलेल्या नासक्या टाळक्यांना विरोधात एखादा शब्द जरी लिहिला की अक्षरशः मुळव्याधाची व्याधी झाल्याप्रमाणे बुडाची आग होण्यास सुरूवात होते आणि बदणामी झाल्याचा कांगावा करीत त्या पत्रकाराच्या मुळावर घाव घालण्याचे षड्यंत्र रचत लोकशाहीच्या यथेच्छ गप्पा ठोकणारे लोकशाहीचे मारेकरी बनून स्वतःचा खरा चेहरा दाखवण्यास सुरूवात करतात अश्या 'विषारी सापांना' समाजसेवक....जनहीतवादी नेता....झुंजार नेता....लढवैया नेतृत्व.....विकास पुरूष....हृदय सम्राट....विकासरत्न....अश्या असंख्य उपमा देवून सर्वसामान्य जनतेच्या नजरेत आम्ही ज्यांना नायक ठरवण्याचे पाप करतो शेवटी हेच पापी आमच्या आयुष्यात खलनायक बनून आमच्यासह संपुर्ण कुटुंबाच्या मुळावर उठतात अश्या लोकशाहीच्या मारेकऱ्यांना वेळीच ओळखून आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवून दिली नाही तर कळतनकळत आम्ही सुध्दा लोकशाहीचे मारेकरीच ठरणार आहोत यात तिळमात्र शंका नाही....

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या