💥कारगिल विजय दिनानिमित्त शहिद शूर सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली......!


💥यावेळी शहिदांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी केलेल्या त्याग सेवा समर्पणाची माहिती देण्यात आली💥

पुर्णा ; तालुक्यातील धनगर टाकळी येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक हायस्कूल धनगर टाकळी या ठिकाणी आज सोमवार दि.२६ जुलै २०२१ रोजी कारगिल विजय दिनानिमित्त या युद्धामध्ये शहीद झालेल्या शूर सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

मुख्याध्यापक  डी .सी,डुकरे ज्येष्ठ शिक्षकबी.एन.बेदरे,आर.आय.शेख,एस.टी.महाजन, एस.आर.सोळंके,एस.आर.मोरे,चंद्रकांत कुलकर्णी, एम .बी .शेख, विनायक दुधाटे, शिक्षकेतर कर्मचारी नम्रता राठोड, तुकाराम साखरे, गंगाधर अंबुरे आदींची उपस्थिती होती श्रीकांत हिवाळे यांनी कारगिल विजय दिन व शहिदांच्या मातृभूमीच्या रक्षणासाठी केलेल्या त्याग सेवा समर्पणाची माहिती दिली....

Post a Comment

0 Comments