💥श्रमिक एकजुटच्या कार्यालयात आज या श्रध्दांजलीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता💥



परभणी/येथील टी.व्ही.9 या वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी शेख सलिम यांना आज परभणी येथे जिल्हयातील पत्रकारांच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.
येथील श्रमिक एकजुटच्या कार्यालयात आज या श्रध्दांजलीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी उपस्थित पत्रकारांनी शेख सलिम यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी बोलतांना प्राचार्य सुरेश नाईकवाडे यांनी शेख सलिम यांचे जाने खूपच वेदनादायी आहे. एवढया कमी वयात त्यांचे आकास्मात जाने मनाला चटका लावून गेले आहे. पत्रकार उभ्या आयुष्यात पत्रकारीतेच्या धाक-धुकीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष न देता धावपळीत कामालाच प्राधान्य देतो. त्यामुळेच स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष न दिल्याने नकळतपणे आजार चोर पावलाने शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे पत्रकारांनी स्वतःच्या कडे लक्ष देण्याचे आवाहन केले. पत्रकार अभिमन्यू कांबळे यांनी शेख सलिम हे खूपच हुनहुंनरी पत्रकार होते. बातमीच्या मागे सतत राहुन घडामोडी जनतेपूढे आणल्या. त्यांच्या निधनाने युवा पत्रकार गमावला असे म्हटले. यावेळी हमीद मलिक यांनी शेख सलिम यांच्या कुटूंबियांची माहिती देऊन सर्वांनी त्यांच्या कुटूंबियांची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. पत्रकार दिलीप माने यांनी शेख सलिम यांच्या कुटूंबियांना मदत करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन केले. यावेळी डॉ.आसाराम लोमटे यांनी पत्रकारांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करतांना शेख सलिम यांच्या विषयी माहिती दिली. याप्रसंगी राजु हट्टेकर यांनीही श्रध्दांजलीपर भाषण केले. या कार्यक्रमास पत्रकार सुरज कदम, प्रविण देशपांडे, मोहन धारासुरकर, प्रभू दिपके, मोहसीन खान, मोईन खान, गजानन देशमुख, कैलास चव्हाण, शेख इफतेखार, धाराजी भुसारे, प्रविण चौधरी, मंदार कुलकर्णी, सखाराम शिंदे, लक्ष्मण मानोलीकर, राहुल रोडे, दिलीप बनकर, संतोष कदम, विजय कुलदिपके, राजेश बालटकर, विजय कदम, यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
शेख सलिम यांच्या कुटूंबियांना मदतीचे आवाहन
या शोक सभेत शेख सलिम यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत करण्याचा ठराव घेण्यात आला असून दि.29 जुलै 2019 सोमवारी जमा झालेल्या रकमेचा एफ.डी.आर.काढण्यात येणार असून परभणी जिल्हयातील सर्व पत्रकारांनी आपल्या स्वयंस्फुर्तीने व यथा शक्तीने शेख सलिम यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत करावी. ही आर्थिक मदत प्राचार्य सुरेश नाईकवाडे मो.9850033555 यांच्याकडे किंवा स्टेट बॅंक ऑफ इंडिया मुख्य शाखा परभणी खाते क्रमांक 11183392712 आय.एफ.सी. कोड SBIN 0003667 या ठिकाणी सोमवार पर्यंत जमा करावी, असे आवाहन पत्रकारांच्या वतीने करण्यात आले आहे...