💥समर न्युज हेडलाईन्स - महत्त्वाच्या विशेष हेडलाईन....!




💥इस्लाममध्ये लग्न एक करार आहे, याला जन्मोजन्मीचा मुद्दा बनवू नका - खा.ओवेसी💥


✍ मोहन चौकेकर

१. ब्रिटनच्या मंत्रिमंडळात ऋषि सुनक, प्रिती पटेल आणि अलोक शर्मा या तीन भारतीय वंशाच्या व्यक्तींना संधी. प्रिती पटेल यांच्याकडे गृहमंत्रीपद

२. नीरव मोदीचा जामीन अर्ज लंडनच्या कोर्टाने आज पुन्हा एकदा फेटाळला असून पुढील सुनावणी २२ ऑगस्ट रोजी होणार

३. मुलीच्या लग्नासाठी राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेली नलिनीची ३० दिवसांच्या पॅरोलवर सुटका

४. इस्लाममध्ये लग्न एक करार आहे, याला जन्मोजन्मीच मुद्दा बनवू नका. ओवेसींचा तीन तलाक विधेयकाला जोरदार विरोध

५. पश्चिम बंगालमध्ये भाजपा खासदाराच्या घरावर काही अज्ञातांनी गोळीबार केला, तसेच बॉम्बही फेकले

६. महेंद्रसिंह धोनीची पोस्टिंग काश्मीरमध्ये, पेट्रोलिंग(गस्त), गार्ड, पोस्ट ड्युटी यांसारखी जबाबदारी तो सांभाळणार

७. आता मेसेजप्रमाणे पैसेही सहज पाठवता येणार; लवकरच सुरु होणार WhatsAppची UPI पेमेंट सेवा

८. मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुंबईला पाणी पुरवठा करणारं तानसा धरण ओव्हरफ्लो

९. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे

१०. श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांचे निकष व कार्यपद्धती सुधारण्यासाठी एक समिती गठित करण्यात येणार -  क्रीडामंत्री आशिष शेलार

११. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आणि बी साई प्रणित या दोघांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

१२. 'सिम्बा-द लायन किंग'ची भारतीय सिनेमागृहांमध्ये जोरदार कमाई, आठवड्याभरामध्ये ७५ कोटी रूपयांपेक्षा जास्त कमाई...

Post a Comment

0 Comments