🌟या घटनेत शेतकऱ्यासह त्यांचा बैलही मृत्युमुखी पडला आहे🌟
परभणी (दि.२३ मे २०२३) - परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातील निवळी खुर्द या गावच्या शिवारात आज मंगळवार दि.२३ मे रोजी सायंकाळी ०४-०० वाजेच्या सुमारास विज कोसळून एका शेतकऱ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
घटनेतील मयत शेतकऱ्याचे नाव लक्ष्मण साहेबराव ठोंबरे असे असून मयत शेतकरी आपल्या शेतात काम करत होते, त्यावेळी वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट सुरू झाल्याने मयत शेतकरी लक्ष्मण ठोंबरे यांनी लिंबाच्या झाडाखालील बैल जोडी अन्यत्र हलविण्याचा प्रयत्न सुरू केला त्यावेळी विज कोसळून ते जागीच मृत्यू पावले या घटनेत शेतकऱ्यासह बैलही मृत्युमुखी पडला आहे......
0 टिप्पण्या