🌟पुर्णा शहरातील डॉ.आबेडकर नगर परिसरात एकावर शसस्त्र जिवघेणा हल्ला....!


🌟शसस्त्र हल्ला करणाऱ्या हल्लेखोरावर पुर्णा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल🌟

पुर्णा (दि.२९ एप्रिल) - पुर्णा शहरातील डॉ.आंबेडकर नगर परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहा जवळ आपल्या मित्रा सोबत बोलत उभे असलेले सचिन संजय मगरे वय ३२ वर्षे राहणार आंबेडकर नगर यांच्यावर याच परिसरात राहणाऱ्या गौरव उर्फ सोनू कैलास खंदारे या आरोपीने जिवे मारण्याच्या उद्देशाने प्रथमतः त्याच्या कंबरेला असलेल्या पिस्टल सारख्या काळ्या रंगाच्या शास्त्राने फायरींग करीत त्यानंतर त्याच्याकडील खंजरने जिवघेणा हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना काल मंगळवार दि.२९ एप्रिल २०२४ रोजी भरदुपारी ०४-३० वाजेच्या सुमारास घडल्याने संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण निर्माण असून या घटने संदर्भात सचिन संजय मगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात पुर्णा पोलीस स्थानकात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात सविस्तर वृत्त असे की फिर्यादी सचिन मगरे व त्यांचे मित्र प्रविण कनकुटे हे दोघे काल मंगळवार दि.२९ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ०४-०० वाजेच्या सुमारास आंबेडकर नगर परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहा जवळ बोलत उभे असतांना अचानक तिथं आलेला आरोपी गौरव उर्फ सोनू कैलास खंदारे याने त्यांना उद्देशून कुत्रेहो तुम्ही लय माजलात असे म्हणून त्याच्या कंबरेला असलेल्या काळ्या रंगाच्या पिस्टला सारख्या शस्त्रातून त्यांच्या दिशेने फायरींग केली यावेळी सचिन मगरे यांनी सावधानता बाळगून निशाना चुकवला परंतु यानंतर त्याने त्यांच्याजवळील खंजरने त्यांच्यावर जबर वार केल्याने त्यांच्या डाव्या खांद्यावर जबरदस्त जखम झाली यावेळी आसपासचे सर्व नागरिक भितीपोटी त्या ठिकाणाहून पळून गेले सदरील घटना घडवून आरोपी त्या ठिकाणाहून निसटला घटनेचे गांभीर्य ओळखून प्रविण कनकुटे यांनी गंभीर जखमी अवस्थेतील सचिन मगरे यांना सोबत घेऊन पुर्णा पोलीस स्टेशन गाठले यावेळी फिर्यादी सचिन मगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायंकाळी उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते यावेळी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गौरव उर्फ सोनू कैलास खंदारे याच्या विरोधात पुर्णा पोलीस स्थानकात गुरनं.१४३/२०२४ चे कलम  ३०७ भादविसह कलम ४/२५,६/२७ भाहका (भारतीय हत्यार कायदा) अंतर्गत रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या