🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या.....!


🌟मणिपूर हिंसाचार: आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू झाला असून 1700 घरे जाळण्यात आली - मुख्यमंत्री एस.बिरेन सिंह

✍️ मोहन चौकेकर 

* डिआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकरच्या शेअरिंगमध्ये पाकीस्तानातील ईमेल, फोटो, व्हिडिओ, फाईल्सही प्रसारित ATS च्या तपासातून निष्पन्न, 15 मे पर्यंत ATS च्या कोठडीत ठेवण्याचे आदेश 

* रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची फेरनिवड

* सोलापुरात 21 जूनच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला साडेपाच हजार योग साधक सहभागी होणार; सुधा अळळीमोरे यांचे प्रतिपादन

* सिंधुदुर्गमध्ये 50 हजार वर्षांपूर्वी तयार झालेलं अशनी विवर सापडल्याचा अभ्यासकांचा दावा

* पुणे जिल्ह्यात पाणीटंचाई; २४ गावांतील सुमारे ४० हजार नागरिकांची तहान टॅंकरवर

* मुंबई-गोवा महामार्गावर महाड जवळ एसटी व डंपरच्या धडकेत १८ प्रवासी जखमी

* पावसामुळे मातीचा भराव रस्त्यावर, परशुराम घाटातील वाहतूक बंद; वाहनांच्या लांबच लांब रांगा

* पुण्यात ११ ते १३ जून दरम्यान होणाऱ्या जी 20 च्या दुसऱ्या बैठकीसाठी तयारी

* पूरग्रस्त भागातील नागरिकांशी संवाद साधण्या सोपे यासाठी देशातील पहिली बिनतारी संदेश यंत्रणा हॅम रेडिओ कार्यान्वित , पहिला प्रयोग कोल्हापूरात

* कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत मारलेल्या छापेमारीमध्ये 375 कोटी रुपये जप्त 

* भाषणादरम्यान सुषमा अंधारेंना अश्रु अनावर, साताऱ्यात एका पुरस्कार वितरण सोहळ्यात भाषण करताना कोसळले रडू

* मणिपूर हिंसाचार: आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू झाला असून 1700 घरे जाळण्यात आली, मणिपूरचे मुख्यमंत्री एस. बिरेन सिंह यांची माहीती

* आफताब पुनावाला केस: भारतीय दंड संहिता (आयपीसी) अंतर्गत कलम 302 (हत्या) आणि कलम 201 (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत आरोप निश्चित, 1 जूनपासून सुनावणी

* उल्हासनगर : नवरदेवाच्या वाहनाच्या धडकेत वऱ्हाडी जखमी; एक जण गंभीर जखमी, 11 जण जखमी, उपचार सुरू

* पुणे: विमाननगर भागात आयटी बिझनेस हबमध्ये दुपारी लागली आग; अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणून दोन हजार कर्मचारी केले सुरक्षित

* द केरला स्टोरीचा वाद : बंदीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी,आधी म्हटले होते - चित्रपट चांगला की वाईट हे बाजार ठरवेल

* राज्यात लवकरच दोन टप्प्यात शिक्षक भरती, पहिल्या टप्प्यात 30 हजार पदांची तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार पदांची भरती करण्यात येणार

* मुंबई मनपा इलेक्शन : भाजपने कसली कंबर, मिशन 150 ही योजना निवडणूक जिंकण्यासाठी राबवण्यात येणार

*◆संजय राऊत गायब ? दररोज सकाळी पत्रकार परिषद घेणाऱ्या संजय राऊतांनी गेले दोन दिवस कोणतीच पत्रू परिषद घेतली नाही. ना कुठले स्टेटमेंट दिले. राजकीय वर्तुळात खळबळ.

*◆आदीपुरुष सिनेमाचा ट्रेलर लाँच : रामायणावर आधारीत प्रभास, क्रिती सनन, देवदत्त नागे, सैफ अली खान अशी स्टारकास्ट असलेला मोस्ट अवेटेड सिनेमा.

*वारस नोंदीसाठी आता तलाठी कार्यालयात जायची गरज नाही.

* महाराष्ट्र सरकारच्या ‘ई-हक्क’ प्रणालीद्वारे घरबसल्या तो अर्ज करता येतो. १८ व्या दिवशी संबंधित व्यक्तीचा अर्ज व कागदपत्रे अचूक असल्यास सातबारावर नोंद होईल.

* सीरम इन्स्टिट्यूटच्या संचालकाविरोधात ईडीची मोठी कारवाई, कोट्यवधींची मालमत्ता जप्त*

* ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक झेड. एस. पूनावाला यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. पनामा पेपर प्रकरणात झेड. एस. पूनावाला यांचे काही व्यवहार संशयास्पद आढळले होते. याप्रकरणी ईडीने त्यांच्यावर कारवाई केली असून त्यांची मुंबईतील सीजे हाऊसमधील ४१.६४ कोटी रुपये किमतीच्या तीन स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. फेमा कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

* पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना राजधानी इस्लामाबादमध्ये अटक

* पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना राजधानी इस्लामाबादमध्ये अटक. इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेर अटक. त्यांच्याविरुद्ध न्यायालयीन संकुलाबाहेर तोडफोड, सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि गोंधळ घालणे, असे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आंतरिम जामिनाची मुदत संपल्याने झाली अटक.

* आमदारांना सरकारकडून दरमहा १ लाख रुपये घर भाडे

* नरिमन पॉइंट भागातील ‘मनोरा’ आणि कुलाब्यातील ‘मॅजेस्टिक’ या आमदार निवासस्थानांमध्ये खोल्या उपलब्ध नसलेल्या आमदारांना सरकारकडून दरमहा १ लाख रुपये घर भाडय़ासाठी दिले जात आहेत. 

* यासाठी गेल्या 5 वर्षांत तब्बल १२८ कोटी खर्च झाले असून पुढील काही वर्षांत आणखी १०० ते १५० कोटींचा बोजा सरकारी तिजोरीवर पडणार आहे.

* शेअर बाजार : सेन्सेक्स 2 अंकांनी घसरून 61,761.33 अंकांवर बंद, तर निफ्टी 1 अंकांनी वाढून 18,265.95 अंकांवर बंद

* तिकिट विक्री बंद?* गो फर्स्ट एअरलाईन्सने भाडेतत्वावर विमाने नसल्याने बंद केली तिकिट विक्री, कंपनी दिवाळखोरीत गेल्यामुळे तिकिट विक्रीची प्रक्रिया बंद

* तब्बल 1 लाख नागरिकांना रोजगार मिळणार : iPhone चे उत्पादन करणाऱ्या फाॅक्सकाॅन कंपनीने बंगळुरुत घेतली जमीन, फाॅक्सकाॅन बंगळुरुत नवा प्लांट सुरु करणार

* सोन्याचे आजचे दर:* मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे भाव प्रती 10 ग्रॅमसाठी 56700 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 61850 रुपये..,

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या