🌟धनगर टाकली येथील विज पडून मृत्यू झालेल्या मयत विठ्ठल कोकरे यांच्या कुटुंबास ४ लाख रुपयांचा धनादेश प्रदान...!


🌟पुर्णेचे तहसिलदार माधवराव बोथीकर यांनी मयताच्या पत्नी श्वेता कोकरे यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन दिला धनादेश🌟

पुर्णा (दि.०४ मे २०२३) - पुर्णा तालुक्यात दि.२६ एप्रिल २०२३ रोजी झालेल्या विजेच्या कडकडाटासह वादळीवारा व अवकाळी पावसा दरम्यान तालुक्यातील धनगर टाकळी येथे शेतात काम करीत असताना अंगावर विज पडून मयत झालेले शेतकरी विठ्ठल कोकरे यांची वारस पत्नी श्वेता विठ्ठल कोकरे यांना आज गुरुवार दि.०४ मे २०२३ रोजी तातडीची आर्थिक मदत म्हणून पुर्णेचे सन्मानीय तहसिलदार श्री माधव बोथीकर यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन मयताची वारस पत्नीस ४ लाख रुपयांचा धनादेश दिला यावेळी धनगर टाकळीच्या सरपंच श्रीमती मीराबाई माटे,नायब तहसीलदार नितेशकुमार बोलोलु, मंडळ अधिकारी शिवाजी कराड  तलाठी अंकुश राठोड.आदींची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या