🌟परभणी जिल्हा इंडियन रिपोर्टस असोसिएशनच्या वतीने रुग्न तपासणी शिबिर संपन्न...!


🌟शहरातील कौसर हॉस्पिटलमध्ये करण्यात आले होते रुग्न तपासणी शिबिराचे आयोजन🌟


परभणी (दि.०६ मे २०२३) - जागतिक स्तरावरील मार्शल आर्ट क्रीडा प्रकारातील ज्युडो कराटे चे नामवंत कोच तथा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कराटे क्षेत्रातील विविध ऑर्गनायझेशनचे उच्च पदस्थ ,इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन इंटरनॅशनल नवी दिल्लीचे राष्ट्रीय सरचिटणीस मोहम्मद जहांगीर यांचा ५ मे रोजीचा वाढदिवस इंडियन रिपोर्टस असोसिएशन महाराष्ट्राच्या परभणी जिल्हा शाखेतर्फे येथील कौसर हॉस्पिटल मध्ये रुग्णांचे तपासणी शिबिर घेउन साजरा करण्यात आला.


यावेळी सर्वप्रथम सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर सालेहा कौसर यांचा सत्कार इंडियन रिपोर्टस असोसिएशनचे परभणी जिल्हा अध्यक्ष मदन बापू कोल्हे यांनी केला , कौसर हॉस्पिटलचे संचालक डॉ.अ.सलीम यांचा सत्कार ' इ रा ' चे मराठवाडा प्रसिद्धी प्रमुख महमुद पठाण यांनी केला.तसेच डॉ.राफे अब्दुल सलीम तडवी यांचा सत्कार  'इरा 'चे परभणी जिल्हा पीआरओ मा.कार्यकारी अधिकारी तथा सा वैभव ज्वालाचे संपादक देवानंद वाकळे यांनी केला यावेळी वाढदिवसाचा केक इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन चे मराठवाडा पि.आर.ओ तथा परभणी आज तक चॅनल चे महमुद पठाण यांचे हस्ते कापण्यात आला . 

यावेळी महमूद खान पठाण यांचाही वाढदिवस असल्याने याच कार्यक्रमात त्यांनाही शुभेच्छा देऊन महमुद पठाण यांचे उपस्थितांतर्फे अभिनंदन करण्यात आले डॉक्टर सालेहा कौसर मॅडम यांचे हस्ते यावेळी रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी 'इरा ' चे परभणी तालुका अध्यक्ष अ.रहीम,सा.विठोबा चे कार्य कारी संपादक प्रविण मोरे,डॉ.झाकेर हुसेन काॅलेज चे संचालक समाज भूषण बशिर अहमद खान, समाज सेवक लक्ष्मण पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  'इरा 'चे पी आर ओ देवानंद वाकळे यांनी केले .यावेळी उपस्थित सर्व रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना फराळाचे वाटप करण्यात आले हे शिबिर व वाढदिवस कार्यक्रम साजरा करण्यासाठी डॉ.हुमा कौसर , डॉ.आलिया इनामदार , सिस्टर दीक्षा जोगदंड , प्रियंका सुतारे , निशा लव्हेकर यांनी परिश्रम घेतले . या वेळी कौसर हाॅस्पीटल मध्ये रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या