🌟बैठकीत भाजपच्या बोर्डीकर गटाचे चौदा आणि महाविकास आघाडीचे चार असे सर्व संचालक उपस्थित होते🌟
जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर
जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे गंगाधर बोर्डीकर आणि उपसभापतीपदी सुंदर चव्हाण यांची निवड करण्यात आली प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक निबंधक एम.ए.भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी बाजार समितीच्या सभागृहात नवनिर्वाचित अठरा संचालकांची विशेष बैठक घेण्यात आली. यात सभापतीपदाकरिता गंगाधर बोर्डीकर यांचा आणि महाविकास आघाडीचे मनोज थिटे यांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते.छाननीत दोन्ही अर्ज वैध ठरले. त्यामुळे सभापतीपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यात गंगाधर बोर्डीकर यांना चौदा व मनोज थिटे यांना चार मते मिळाली.तर उपसभापतीदासाठी सुंदर चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाला असल्याने त्यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली.
आजच्या बैठकीत भाजपच्या बोर्डीकर गटाचे चौदा आणि महाविकास आघाडीचे चार असे सर्व संचालक उपस्थित होते. या निवडणुक प्रक्रियेत प्राधिकृत अधिकारी भोसले यांना संस्थेचे सचिव सतीश काळे, सहायक सहकार अधिकारी मनमितसिंग, सहसचिव जी. के. हरगावकर यांनी सहकार्य केले निवडणुकीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करत नवनिर्वाचित सभापती,उपसभापती यांची ढोलताशांच्या गजरात शहरातील नगरेश्वर मंदिराच्या सभामंडपा पर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी व्यापाऱ्यांसह विविध क्षेत्रातील नागरिकांनी सभापती व उपसभापती यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले.....
0 टिप्पण्या