🌟परभणी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राची ‘शासकीय योजनांची जत्रा’ ....!


🌟या कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थ्यांना विविध योजनांचा मिळणार लाभ🌟

परभणी (दि.२ मे २०२३) :-  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी यांच्या मार्फत ‘शासकीय योजनांची जत्रा’ या विशेष कार्यक्रमाअंतर्गत पुढील योजनांचा लाभ जिल्ह्यातील लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. 

‘शासकीय योजनांची जत्रा’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सुशिक्षित बेराजगार उमेदवरांना राज्यातील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी पंडित दिन दयाळ उपाध्याय 1 ऑफलाईन आणि 1 ऑनलाईन रोजगार मेळावे असे एकूण 2 मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून किमान 50 उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण घेऊन यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण या कार्यालयामार्फत विविध योजनेअंतर्गत स्किल इंडिया पोर्टलवर नोंदणीकृत प्रशिक्षण संस्थेकडून कौशल्य विकास प्रशिक्षण राबविले जाते. कौशल्य विकास प्रशिक्षण घेऊन यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या एकूण 30 प्रशिक्षणार्थ्यांना ‘जत्रा शासकीय योजनांची’ या उपक्रमांतर्गत प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या mahaswayam या वेबसाईटवर राज्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना job Seeker म्हणून नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. job Secker म्हणून नोंदणी केलेल्या उमेदवारांना त्यांच्या प्रोफाईलमध्ये राज्यामध्ये विविध ठिकाणी आयोजित होणारे रोजगार मेळावा, उपलब्ध असणाऱ्या रोजगाराच्या संधी पाहता येऊ शकते व त्याद्वारे रोजगार उपलब्ध करता येऊ शकतो. त्यामुळे ‘शासकीय योजनांची जत्रा’ या उपक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यातील एकूण 200 सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांची mahaswayam या वेबसाईटवर job Seeker म्हणून नोंदणी करणेसाठी "सुशिक्षीत बेरोजगार उमेदवार नोंदणी अभियान आयोजित करण्यात येणार आहे.

मराठा समाजातील व ज्या समाजासाठी महामंडळ उपलब्ध नाही अशा आर्थिक मागास घटकास आण्णासाहेब पाटिल आर्थिक मागास विकास महामंडळातंर्गत शासनमान्य व्यावसायीक कर्जावर व्याज परतावा देण्याची योजना राबविण्यात येते. ‘शासकीय योजनांची जत्रा’ या विशेष कार्यक्रमातंर्गत कर्ज व्याज परतावा योजनेसाठी अर्ज केलेल्या एकूण 40 लाभार्थ्याना पात्रता प्रमाणपत्र (LOI) देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून जास्तीत-जास्त लाभार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या