🌟परभणी जिल्ह्यात मृग नक्षत्रांचे आगमन होण्या अगोदर शेतकरी बांधवांच्या विविध अडचणी सोडवल्या जातील...!


🌟जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी शेताच्या बांधावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतेवेळी दिले वचन🌟


    परभणी :  मृग नक्षत्रांचे आगमन होण्याअगोदर शेतकरी बांधवांच्या पानंद रस्ते,शिव रस्ते इतर काही शेतातील भाऊ बंधकीच्या रस्त्याच्या व भाजीपाला विक्रीसाठी जागेच्या अडचणी सोडवल्या जातील असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले .


         [जिल्हाधिकारी आंचल गोयल जिल्ह्यातील उपस्थित शेतकरी बांधवांना शेताच्या बांधावर मार्गदर्शन करतांना ]

  कै.गंगाधर दादा पवार यांच्या  मार्गदर्शनाखाली सुरू केलेले शेतकरी एकत्रीकरण  भाजीपाला उत्पादक गट परभणी ची त्रैमासिक बैठक शिंगणापूर ता.जि.परभणी येथे प्रगतशील शेतकरी माणिकराव खिल्लारे यांच्या शेतामध्ये घेण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापुरकर, प्रमुख परभणी जिल्हाधिकारी श्रीमती आचल गोयल मॅडम, सामनाचे जिल्हाप्रतिनिधी  सुरेश जंपनगीरे, विद्यापीठातील शास्त्रज्ञ श्रीमती डॉ.स्मिता सोळंकी ,जिल्हा उद्योग केंद्राच्या समन्वयक श्रीमती रुपाली कानगुडे,माणिकराव खिल्लारे, तहसिलदार गणेश चव्हाण, मुख्याध्यापक संजयकुमार जोशी आदीची प्रमुख उपस्थिती होती .शेतकरी बांधवांच्या शेतातील अंजीर , संत्रा , मोसंबी , सफरचंद अदी बागायतीला भेटी देण्यात आल्या . उत्कृष्ट काम करनाऱ्या शेतकरी बांधवांचे व  जिल्हाप्रतिनिधी सुरेश जंपनगिरे सौ . स्वाती घोडके यांचा सत्कार करण्यात आला .

          पुढे बोलतांना ह भ प अच्युत महाराज दस्तापुरकर म्हणतात " कोरोनाच्या काळात जनतेसाठी जगाचा पोशिंदा घरात न बसता घरपोच गरजेच्या वस्तु पोहचित करत राहीला त्यांच्यासाठी भाजीपाला व अन्य उत्पादक विक्री करण्यासाठी जागा निश्चित करून द्यावी अशी विनंती केली .

     कार्यक्रमासाठी उपस्थित जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी पंडित थोरात , प्रकाश हरकळ , रामेश्वर साबळे ,प्रताप काळे ,बालासाहेब हिंगे ,एकनाथराव साळवे, सभांजी गायकवाड,सुदाम माने तसेच भाजीपाला ग्रुपचे इतर सर्व सदस्य यांनी कार्यक्रम यशस्वीरित्यासाठी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुंजाजी शिळवणे यांनी केले तर  सूत्रसंचालन साहाय्यक तंत्रज्ञान आत्मा व्यवस्थापक सौ.स्वाती घोडके यांनी केले.आभार प्रदर्शन प्रगतसिल शेतकरी जनार्धन आवरगंड यांनी केले.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या