🌟पुर्णा-नांदेड राज्य मार्गावरील रेल्वे उड्डाण शहिद शुरवीर जवान सुर्यकांतराव जोगदंड यांचे नाव देण्याची मागणी...!


🌟तर ताडकळस फाट्यास राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे तर कानखेड फाट्यास आहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची मागणी🌟

🌟बाळासाहेबांची शिवसेना प्रणीत युवा सेना शहर प्रमुख अंकीत कदम यांनी जिल्हाधिकारी परभणी यांना दिले निवेदन🌟


पुर्णा (दि.०८ मे २०२३) :- पुर्णा-नांदेड राज्य मार्गावरील हिंगोली/नांदेड गेटवर रेल्वे प्रशासनाकडून बांधण्यात येत असलेल्या रेल्वे उड्डाण पुलास सन १९६५ च्या भारत-पाकीस्तान युध्दात शत्रू सैन्याच्या हल्ल्यात विरगती प्राप्त झालेले तत्कालीन परभणी/हिंगोली या सयुक्त जिल्ह्यातील एकमेव विरजवान तथा पुर्णा तालुक्यातील भुमीपुत्र शहिद सुर्यकांतराव जोगंदड उड्डाण पुल असे तर याच राज्यमार्गावरील ताडकळस फाट्यास आरक्षणाचे जनक तथा थोर समाजसुधारक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे तर पुर्णा-ताडकळस राज्य मार्गावरील कानडखेड फाट्यास राजमाता आहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची मागणी आज सोमवार दि.०८ मे २०२३ रोजी एका निवेदनाद्वारे शिवसेना (शिंदे) गटाच्या युवा सेनेचे शहरप्रमुख अंकीत कदम यांनी केली आहे.


शिवसेना (शिंदे) गटाच्या युवा सेनेचे पुर्णा शहरप्रमुख अंकीत कदम यांनी आज सोमवारी जिल्हाधिकारी यांना लेखी स्वरुपात निवेदन देऊन सदरील मागणी केली असून या निवेदनावर सन्माननीय जिल्हाधिकारी आंचल गोयल काय भुमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून शहरप्रमुख अंकीत कदम यांनी केलेल्या मागणीचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.......     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या