🌟जिंतूर पोलीस स्थानकाच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेली दोन दुकाने चोरट्यांनी फोडली....!


🌟डोळ्यात तेल घालून चोरट्यांनी पोलिस स्थानकालगतच घडवला गुन्हा ? रात्रीची गस्त पोलिस प्रशासन केव्हा वाढवणार पुन्हा ?🌟

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर

जिंतूर शहरातील शिवाजी चौक व पोलीस स्टेशन जिंतूर च्या मध्ये असलेली बालाजी वॉच सेंटर व इलेक्ट्रॉनिक तसेच पटेल शूज सेंटर हे दोन दुकाने मध्यरात्री चोरट्याने दुकानाचे टिन पत्रे सरकून दुकानात प्रवेश केला आहे यामध्ये लाखोच्या रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली असल्यामुळे 'डोळ्यात तेल घालून चोरट्यांनी पोलिस स्थानकालगतच घडवला गुन्हा ? रात्रीची गस्त पोलिस प्रशासन केव्हा वाढवणार पुन्हा ? असा संतप्त सवाल व्यापारी व नागरिकांमध्ये उपस्थित होतांना दिसत आहे.

परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील पोलीस स्टेशन व शिवाजी चौक मध्ये असलेले दोन्ही दुकानाचे वरचे पत्थर सरकून दुकानात प्रवेश करून चोरी केली  ज्यामध्ये बालाजी वॉच सेंटर व इलेक्ट्रॉनिक या दुकानांमधील ब्रँडेड मनगटी घड्याळ, दीवाराचे घड्याळ, इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरट्या लंपास केले आहे तसेच याच दुकानाच्या बाजू असलेली पटेल शूज सेंटर मधील ब्रॅण्डेड बूट व चप्पल ही चोरट्याने लंपास केले आहे या दोन्ही दुकानदारांचा लाखोचा माल लंपास झाल्याचा अंदाज आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे, पोलीस हेडकॉन्स्टेबल लीला जोगदंड, देशपांडे,  पोलीस उपनिरीक्षक सय्यद तसेच पोलीस कर्मचारी  घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे तसेच शवण पथक व फिंगरप्रिंट एक्सपर्ट पाचरण करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक वाघमारे यांनी सांगितले आहे ही चोरीची घटना पोलीस स्टेशनपासून हाके च्या अंतरावर झाली असल्या मुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी नागरिकांमधून चर्चा होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या