🌟परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ तालुक्यातील करम येथे प्रियकराने केला प्रेयसीच्या आईचा घातक शस्त्राने भोसकून खून....!


🌟घटनेत विमलबाई उजगरे यांचा जागीच मृत्यू🌟

परभणी (दि.१६ मे २०२३) - परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ तालुक्यातील करम या गावी एका प्रियकराने प्रेयसीच्या आईचा रागाच्या भारात घातक शस्त्राने वार करीत निर्घृन खून केल्याची दुर्दैवी घटना काल मंगळवार दि.१५ मे २०२३ रोजी रात्री १०-०० वाजेच्या सुमारास घडली.

         या घटनेतील आरोपी बाळू नारायण मुंडे याचे मयत महिलेच्या मुलीशी प्रेमसंबंध होते परंतु आरोपी त्या मुलीच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला मारहाण सुरु केली होती. त्यास कंटाळून ती मुलगी आईकडे गावी राहण्याकरीता आली तेव्हा मुंडे याने काल सोमवारी करम गाव गाठून तू सोबत चल असे म्हणत हुज्जत घातली. पाठोपाठ तिची आई विमलबाई उजगरे यांना घातक शस्त्राने मारहाण केली. त्यात विमलबाई उजगरे या मृत्यू पावल्या. तर पंडीत मुंडे नामक व्यक्ती जखमी झाला. सोनपेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या